सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यामध्ये, अवैध शस्त्र / अग्नीशस्त्राचा वापर करून घडलेल्या घटनांचे पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यास प्रतिबंध करून, कारवाई करणे बाबत, मा. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अम्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने, दिनांक २९/०९/२०२५ रोजी, गुन्हे शाखेकडील नेमणूकीस असलेले, पोकॉ/१०७५ भारत पाटील यांना. गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, सोलापूर-अक्कलकोट हायवे जवळील, बी.एस.एन.एल. टॉवर जवळ, सर्व्हिस रोडवर, एका पांढऱ्या रंगाची बलेनो कार व दोन इसम हे टि.व्ही.एस. आपाचे कंपनीच्या मोटार सायकलवर थांबले असून त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे."त्यानुसार प्राप्त बातमी बाबत सविस्तर माहिती अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना देवून त्यांचे सूचनेनुसार गुन्हे शाखेकडील सपोनि, दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक असे बातमीचे ठिकाणी गेले. तेंव्हा त्यांना तेथे एक पांढऱ्या रंगाची बलेनो कार व आपाची मोटार सायकलवर दोन इसम थांबल्याचे दिसून आले. त्यावेळी, सपोनि दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक असे, नमूद ठिकाणी थांबलेल्या संशयीत इसमांकडे जात असताना, नमूद इसमांना पोलीस पथकाचा संशय आल्याने, मोटार सायकलवरील दोन इसमांपैकी पाठीमागील बाजूस बसलेला इसम सदर ठिकाणावरून पळून गेला. त्यावेळी, सपोनि दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकाने, मोटार सायकलवरील दुसऱ्या इसमास व पांढऱ्या रंगाचे कारमधील एका संशयीत इसमास जागीच
ताब्यात घेतले.त्यावेळी, नमूद दोन्ही इसमांना त्यांचे नाव, पत्ता व इत्तर माहिती विचारली असता, कारमधील इसमाचे नाव -सचिन सिध्दाराम झगळघंटे, वय-३८ वर्षे, रा. कर्देहळ्ळी रोड, कुंभारी जि. सोलापूर व मोटारसायकल वरील इसमाचे नाव- फरहान अखिल शेख, वय १९ वर्षे, रा.१०१/२, अमन चौक, नविन विडी घरकुल, सोलापूर, असे असल्याचे सांगितले. त्यावेळी, वरील नमूद दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता, इसम नामे-सचिन सिध्दाराम झगळघंटे याने, परिधान केलेल्या पँटचे डाव्या बाजूस कंबरेस खोचलेले एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व खिशामध्ये ०२ जिवंत काडतुसे मिळुन आली. तसेच, इसम नामे- फरहान शेख याने, परिधान केलेल्या पँटचे डाव्या बाजूस कंबरेस खोचलेले एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व खिशामध्ये ०८ जिवंत काडतुसे मिळुन आली. त्याअनुषंगाने, मिळून आलेल्या अग्नीशस्त्राचे परवान्या बाबत, दोन्ही इसमांकडे अधिक चौकशी केली असता, तसा कोणताही परवाना त्यांचेकडे नसून, सदरचे दोन्ही पिस्तूल हे विक्री करण्यासाठी सदर ठिकाणी आल्याचे सांगितले. तसेच, पळून गेलेल्या इसमाचे नाव-रमेश विश्वनाथ धुळ, रा. सध्या कुंभारी, मुळ रा. कर्नाटक असे असल्याचे सांगितले. त्यावरून नमूद इसमांविरूध्द एम.आय.डी.सी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं-८०९/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये, गुन्हा नोंद करणेत आला असून इसम नामे सचिन सिध्दाराम झगळघंटे व फरहान अखिल शेख यांचे ताब्यातील दोन गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, एक मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार व टि. व्ही. एस. आपाचे कंपनीची मोटार सायकल, असा एकूण १०,१०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सपोनि दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजु मुदगल, महेश पाटील, सिध्दाराम देशमुख, सायबर पोलीस ठाणे कडील मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे

