मंद्रूप (प्रतिनिधी) - वडकबाळ येथील सीना नदी परिसरातील पूरग्रस्तांना सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते चादर, जेवण आणि नाश्ता देण्यात आला.महापुरामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या पूरग्रस्त गावांच्या पाहणीसाठी सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आले होते. यावेळीत्यांनी पूरग्रस्तांना दिलासा देत नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. या पुराने नदीकाठच्या लोकांचे अतोनात नुकसान केले असून, याची जाणीव ठेवत पोलिस प्रशासनाने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केला आहे.यावेळी तहसीलदार सुजित नरहरे, सपोनि मनोज पवार, पोलिस पाटील अशोक पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
सोलापूर जिल्हा
