सोलापूर (प्रतिनिधी)- दिलीपराव माने विचारमंचच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी जुळे सोलापूर येथील के एल ई शाळेच्या मैदानावर ४० फुटी रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत दिलीपराव माने विचारमंचच्या वतीने करण्यात आले आहे. रावण दहनाचे कार्यक्रम गुरुवार दि.२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी भारती विद्यापीठ ते के एल ई शाळेच्या मैदानापर्यंत रामलीला ची भव्य शोभायात्रा निघणार आहे.या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांसह कर्नाटक मधून १२ फुटी बाहुल्यांचा समावेश असणार असल्याचे पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेस महेश घाडगे सचिन चौधरी शाम पाटील प्रदीप सुरवसे ओंकार केंगार सह दिलीपराव माने विचारमंचचे अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
