घातक शस्त्रानिशी खंडणी मागुन जबरी चोरी करणारा सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर हा एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द

 


सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर, वय ३४ वर्षे, रा. घ.नं १५२, सळई मारुती जवळ, उत्तर कसबा, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत करणे, घातक शस्त्राने जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, गैरनिरोध करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दगडफेक करणे, हयगईने मानवी जीवनास धोका पोहचविणे, धाकदपटशा करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०६ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१३ मध्ये क. १०७ फौ.प्र.सं अधिनियमानुसार, सन २०१४ मध्ये क.५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये व सन २०१७, २०२४ मध्ये क.३ एमपीडीए कायदा, १९८१ अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.२६/०९/२०२५ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, दि.२९/०९/२०२५ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.सदरची कारवाई ही, एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, महादेव राऊत, वपोनि, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सपोनि/तुकाराम घाडगे गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form