यंत्रमाग उद्योग टिकविण्यासाठी कामगार सेनेचे प्रयत्न हे अत्यंत उल्लेखनीय आहे : पेंटप्पा गड्डम

 


सोलापूर (प्रतिनिधी)-  डबघाईला  आलेल्या यंत्रमाग उद्योगास पुनर्वैभव  निर्माण करून यंत्रमाग उद्योग टिकविण्यासाठी व यंत्रमाग उद्योगातील कामगार जगविण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा संयुक्त मेळावा आयोजित केला आहे., हे अत्यंत उल्लेखनीय व सामाजिक बांधिलकी जपणारे आहे., असे गौरवोद्गार यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष श्री पेंटप्पा गड्डम यांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने यंत्रमाग कामगारांची दशा व यंत्रमाग उद्योगाची दिशा या अंतर्गत यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांच्या आयोजित केलेल्या या संयुक्त मेळाव्यात उपस्थित यंत्रमाग कामगार व मालक प्रतिनिधींना आपले मत मांडताना वरील उद्गार काढले.महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेना कार्यालयात यंत्रमाग कामगार व यंत्रमाग कारखानदार यांचा संयुक्त मेळावा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष  कारमपुरी (महाराज), यंत्रमाग धारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी, महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस श्रीनिवास चिलबेरी, महाराष्ट्र कामगार सेनेचे कायदेशीर सल्लागार मुनिनाथ कारमपुरी, समाजसेवक बाळकृष्ण गोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले.प्रारंभी मान्यवरांचे व कामगारांचे स्वागत कामगार सेनेच्या प्रसिद्धी प्रमुख रेखा आडकी यांनी केले., त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले., त्यानंतर प्रास्ताविकात श्रीनिवास चिलवेरी यांनी महाराष्ट्र कामगार सेना उद्योग टिकावा, कामगार जगावा या उद्देशाने काम करते, म्हणूनच गेल्या पंचवीस वर्षापासून कामगार सेना कामगारात व उद्योगात टिकून आहे.यंत्रमाग संघाचे खजिनदार श्री अंबादास भिंगी यांनी चायना सारख्या देशाला स्पर्धा करण्यासाठी स्वदेशी मालाचा वापर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे म्हणाले. महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी आपल्या भाषणात यंत्रमाग धारकांनी प्रथमतः कामगार आणि मालक हा भेद नाहीसा करावा  आणि उद्योग टिकविण्यासाठी करणाऱ्या प्रयत्नात कामगार सामील होतील पण कामगारांच्या  हक्काच्या मागण्याबाबत आपण सकारात्मक विचार करावा असे मत व्यक्त केले शेवटी आपल्या अध्यक्ष भाषणात पेंटप्पा गड्डाम यांनी आमच्या अनेक मागण्याबाबत सरकार म्हणावे तसे सहकार्य करत नाही., म्हणून या पुढील मुख्य प्रश्न असलेला मूलभूत सुविधा व यंत्रमाग कल्याणकारी मंडळ या दोन्ही प्रश्नाबाबत सरकार विरुद्ध संयुक्त लढा देण्याचा विचार करू असे उद्गार काढले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विठ्ठल कुराडकर यांनी आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शिंदे यांनी केले.,सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, अजय कारमपुरी, शुभम कारमपुरी, प्रसाद जगताप, राधिका मिठठ्ठा, सोहेल शेख, सविता दासरी, यांनी विशेष प्रयत्न केले., सदर मेळाव्यास यंत्रमाग कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form