सोलापूर (प्रतिनिधी)- मौजे येळेगाव, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर यांचेकडून येळेगाव मध्ये शासनाचे १५ वा वित्त आयोग अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे काम केले होते. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर यातील तक्रारदार यांनी सदर कामाचे १,००,०००/-रुपयेचे बील मुल्यांकन प्रमाणपत्रा प्रमाणे मिळणेकरीता प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय दक्षिण सोलापूर येथे सादर केल होता. त्याचा पाठपुरावा यातील तक्रारदार हे करत होते. तक्रारदार हे पाठपुरावा करत असताना सदर कामाचे मंजुर बीलाची रक्कम ग्रामपंचायत बैंक खात्यामधून काढण्याची परवानगी देणेकरीता लोकसेवक संदिप खरबस, पद विस्तार अधिकारी, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर हा स्वतः साठी २०००/- रुपये लाच रक्कम मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि. ३०/१०/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे दिली होती.यातील तक्रारदारने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ला.प्र.वि. सोलापूर पथकाने दि. ३०/९०/२०२५ रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये संदिप खरबस, पद विस्तार अधिकारी, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे केलेल्या कामाची मंजुर बीलाची रक्कम ग्रामपंचायत बँक खात्यामधून काढण्यासाठी स्वतःसाठी म्हणून तक्रारदार यांचेकडे २,०००/- रुपये लाचेची मागणी करुन,गुरुवार रोजी घेवून येण्यास सांगीतल्याचे निष्पन्न झाले.वरील प्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर दि. ३०/१०/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील लोकसेवक शसंदिप खरबस, पद विस्तार अधिकारी, याने जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर येथे तक्रारदार यांचेकडून २०००/- रुपये लाच स्वीकारली असता चंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्या विरुध्द सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा वाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि., पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक, अजीत पाटील, ला.प्र.वि., पुणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे, अर्जुन भोसले, ला.प्र.वि., पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, शैलेश पवार, पोलीस निरीक्षक, पोह अतुल घाडगे, स्वागीराव जाधव, सलीम मुल्ला सर्व नेम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी केली. लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरीक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयास खालील क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर (मो.नं. ९८२३२२५४६५) यांनी केले आहे.
विस्तार अधिकाऱ्याची पातळी खालावली : लाचखोर संदिप सुधाकर खरबस विस्तार अधिकारी दक्षिण पंचायत समिती सोलापूर याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अटक
byदैनिक लोकशाही मतदार
-
