दिवसा घरफोडी करणारे दोन सराईत चोरटे शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद

 


सोलापूर (प्रतिनिधी)- फिर्यादी रेखा कैलास चौधरी, वय ३८ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. ४०१, अंबिका रेसिडेन्सी, कोटणीस नगर, विजापूर रोड सोलापूर या ओम डायग्नोस्टिक सोलापूर येथे नोकरी करतात, त्यांचे पती कैलास चौधरी हे जलसंपदा विभागामध्ये नोकरीस आहेत. दि.२४/०९/२०२५ रोजी घरातील सर्व सदस्य घराला कुलूप लावून, सकाळी १०:०० वा.चे सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेले. त्यांचा मुलगा सर्वेश हा सायंकाळी ०५:३० वा. ते सुमारास घरी परत आला असता, त्यांचे घराचे कुलूप तोडून, घरातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे रु, २,४७,०००/- किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांचे निदर्शनास आले.(ब) तसेच विशाल नगर परिसरात राहणारे सौ. पुनम सतिश वांगी वय-४३ वर्षे व्यवसाय गृहिणी रा. ब्लॉक नं. १५४, विशाल नगर, मेहता स्कूल जवळ, जुळे सोलापूर या दि. २४/०९/२०२५ रोजी दुपारी ०२:३० वा. चे सुमारास कामाचे निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असता, त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी रु.२२,०००/- रोख रक्कम व ०६ ग्रॅम वजनाची सोन्याची दोन मंगळसुत्रे व चांदीचे आरतीचे साहित्य असा सुमारे १,१७,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल चोरुन नेला होता.वरील नमुद घटनांबाबत यातील फिर्यादी सी. रेखा कैलास चौधरी, वय-३८ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. ४०१, अंबिका रेसिडेन्सी, कोटणीस नगर, विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पो. स्टे सोलापूर शहर येथे गु.र.नं. ४५३/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१ (३) ३०५, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरील नमुद दिवसा घरफोडीच्या दोन घटना नवरात्र उत्सव काळात घडल्याने, नमुद दोन्ही घटनांचे गांर्भिय ओळखुन, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळी मिळालेल्या सी.सी.टी. व्ही फुटेजच्या आधारे, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची खात्री करुन आरोपीची ओळख पटविली. सदर आरोपींचा शोध घेत असताना, दि. ३०/०९/२०२५ रोजी सपोनि शैलेश खेडकर, यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे आरोपी नामे (१) सुर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने वय ३४ वर्षे, रा. मोरया हौसींग सोसायटी, वेताळ नगर, चिंचवड, पुणे हा पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची माहिती मिळाली, त्याप्रमाणे त्यास पिंपरी चिंचवड पुणे येथून अटक केली. तसेच दि. ०४/१०/२०२५ रोजी सपोनि शैलेश खेडकर यांनी गुन्हयातील दुसरा पाहिजे आरोपी नामे (२) राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर वय-३५ वर्षे, रा. मु.पो. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यास अटक केली. त्यानंतर गुन्हयाचे तपासात आरोपींकडून, सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने, ६२ तोळे चांदीचे दागीने वस्तू व गुन्हा करणेकामी आरोपींनी वापरलेली एक मोटार सायकल असा एकुण ३,१५,२००/- (तीन लाख पंधरा हजार दोनशे/-) रुपये किंमतीचा ऐवज जप्त करुन, दिवसा लोकवस्तीमध्ये घडलेला गंभीर स्वरुपाचा घरफोडी चोरीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात, कौशल्याने व अविरत परीश्रमाने उघडकीस आणला आहे.सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे तसेच अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हें शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि.शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, तात्या पाटील, बापू साठे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पो. स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form