"ऑपरेशन पहाटचा मानवी चेहरा" या उपक्रमाअंतर्गत वळसंग पोलीस ठाणे हद्दीत वृक्षारोपण दिवाळी निमित्त किट वाटप संपन्न ; वळसंग पोलीस ठाण्याच्या या उपक्रमावर गावकरी खुश

 


सोलापूर (प्रतिनिधी)–जनतेसोबतच पोलिसांची दिवाळी या भावनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने पारधी समाजासोबत दीपावली सण साजरा केला.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या ऑपरेशन पहाट या संकल्पनेतून होटगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच होटगी ग्रामपंचायत हद्दीतील पारधी पिढी येथे देखील हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये एकूण ४०१ वृक्ष लागवड करण्यात आले.ऑपरेशन पहाटचा मानवी चेहरा - या उपक्रमांतर्गत पारधी समाजातील ११५ कुटुंबांसोबत दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फराळ आणि संसारोपयोगी साहित्याचे वाटप करून पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमात पारधी समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र काळे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक विलास यामावार वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल डोंगरी पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांसह समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form