ऑपरेशन पहाट उपक्रमांतर्गत सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याच्या वतीने पारधी समाज बांधवासोबत दिवाळी सण साजरी



सोलापूर (प्रतिनिधी)- अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन ऑपरेशन पहाट उपक्रमांतर्गत वंचिता सोबत दिवाळी या अभिनव उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हयातील पारधी समाजातील कुटुंबियातील बांधवा सोबत दिपाळी सणा निमित्त सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या अंतर्गत असलेल्या रानमसले येथे दिनांक 19.10.2025 रोजी पारधी समाजातील 36 कुटुंबा सोबत दिपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणुन समाजातील कुटुंबियांना / बांधवाना दिपावली निमित्त फराळ आणि संसारोपयोगी साहित्याचे कीट वाटप करण्यात आले आहे.या शिवाय आणखी मौजे संगदरी, दोड्डी, दामलेवस्ती, बीबीदारफळ, एकरूख व पडसाळी या गावाच्या ठिकाणीतील पारधी समाजातील बांधवाना दिपावली निमित्त फराळ आणि संसारोपयोगी साहित्याचे कीट वाटप करण्यात आले. सदरवेळी पारधी समाजातील बांधवानी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करून पुरस्थितीच्या पार्श्वभुमीवर या वर्षी आमची अनोळखी दिवाळी साजरी झाली अशी भावना व्यक्त केली आहे. मौजे रानमसले येथे राम काळे, अध्यक्ष, आदिवासी पारधी समाज यांचे हस्ते सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांना वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी रानमसले येथे कार्यक्रमा करीता उपस्थित असलेल्या पारधी समाजातील महिला, पुरूष व तरूणांना मार्गदर्शन करून एकात्मिक प्रकल्प विकास आणि पारधी समाजासाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. सुशिक्षित तरूणांना शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे कार्यालयाचे स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. महिलासाठी शिलाई मशीन, पापड बनवण्याची मशीन आणि पिठाची गिरणी या सारख्या सुविधा अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून सर्वांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.सदर कार्यक्रमास मौजे पडसाळी, बीबीदारफळ या गावातील पारधी समाजातील बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे, पोहवा/पंकज महिंद्रकर, पोलीस नाईक अनंत चमके व शाम काळे, अध्यक्ष, आदिवासी पारधी संघटना, मौजे रानमसले गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व पारधी समाजाचे 50 ते 60 बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form