सोलापूर (प्रतिनिधी)- अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक वळसंग पोलीस ठाणे यांच्यासह व रविराज कांबळे पोसई व पोलीस हवालदार श्रीशैल माळी. सुनील कुवर. अशोक पाटील. दर्याप्पा व्हाणमोरी . बोका संतोष कुंभार सह मौजे तील्ल्याळ येथील तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करत असलेल्या भट्टीवर रेड करून कारवाई केली.सदर वेळी तिन्ही ठिकाणाची मिळून 1400 लिटर गुळ मिश्रित व बॅरल सह एकूण रक्कम 50400 हजार रुपयाचे रसायन व 70 लिटर तयार दारू किंमत अंदाजे 7000 व तीन आरोपीवर कारवाई करण्यात आलेले आहे.
Tags
सोलापूर जिल्हा
