साप्ताहिक कार्यसम्राट ने समाजाला दिशा देण्याचे काम केलं आहे -पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांचे प्रतिपादन सा.कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे थाटात प्रकाशन


सोलापूर (प्रतिनिधी )- गेल्या दहा वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन सोलापूर च्या पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आले 
 पत्रकारिता एक वसा ध्यास समजून समाजातील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट ने आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात नेहमी आवाज काढत पिढीतांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली असून साप्ताहिक कार्यसम्राट ने समाजाला दिशा देण्याचे काम केलं असून सोलापूर शहर जिल्ह्यात साप्ताहिक कार्यसम्राट ने आदर्श वृत्तपत्र म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण केल्याचं प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांनी प्रकाशन वेळी केलं असून संपादक यशवंत पवार यांनी समाजातील तळागाळांचे प्रश्न शासन दरबारात मांडून वाचा फोडण्याचे काम केलं असल्याचे यावेळी आवर्जून सांगत साप्ताहिक कार्यसम्राट च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष तथा साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी शहर सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी अबीद तांबोळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form