अनैतिक संबंधातून खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता ; ॲड संजीव सदाफुले



सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूरात (दि. 16 ऑक्टोबर 2022, रात्री 10 वा.) शिवशक्ती चौक, एमआयडीसी परिसरात घडलेल्या कल्याणी देवर हत्ये प्रकरणाने सोलापूर शहर हादरले होते. या प्रकरणात कामाची देवर, शिवा देवर आणि महेश देवर या आरोपींनी धारदार शस्त्रांनी कल्याणी देवरचा खून केल्याची घटना घडली होती.घटनेचा पार्श्वभूमी - 16ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री, शिवशक्ती चौक येथे ही भीषण घटना घडली.पोलिस तपासानुसार, कामाची देवर ह्याची  पत्नी सोबत पती फिर्यादी राजेश कन्नन देवर याचा भाऊ कल्याणी देवरचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून यातील आरोपी कामाची देवर, शिवा देवर व महेश देवर या तिघांनी मिळून कल्याणी याचा धारधार शस्त्राने मारहाण करून खून केल्याची फिर्याद मयताचा भाऊ राजेश कनन देवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंदवली होती. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण १४ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आले. याकामी आरोपीचे वकील ॲड संजीव सदाफुले यांनी युक्तवादाच्या वेळी सरकार पक्षाच्या साक्षीदाराच्या विसंगती मेहेरबान कोर्टापुढे मांडल्या आरोपीचा वकिलांचे ग्रह मानून तीनही आरोपींची मेहेरबान कोर्टाने सदर खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.सरकार पक्षाकडून ॲड.आनंद कुर्नुकर यांनी खटल्याचे काम पाहिले, तर आरोपींच्या बचावासाठी ॲड. संजीव सदाफुले, ॲड. सिद्धांत सदाफुले, ॲड प्राची सदाफुले,ॲड. राज सुरवसे, ॲड. गिरीष सुरवसे, ॲड. निलेश वाघमारे आणि ॲड. प्राजक्ता काळे यांनी बाजू मांडली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form