तब्बल 125 सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची तपासणी आणि एक परफेक्ट टीप ; ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणाऱ्या पठ्ठ्यांची टोळी शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद

 


सोलापूर (प्रतिनिधी)- दिनांक ०१/११/२०२५ रोजी सायंकाळी ०७:४५ या. सुगारास सोलापूर शहरातील आर.टी.ओ. ऑफिस रोड, गणेश नगर बस स्टॉप जवळील समर्थ ज्वेलर्स दुकाना समोर तीन अज्ञात इसम निळ्या रंगाचे मोटार सायकलवर आले. त्यापैकी एक इसम हा दुकानाचे बाहेरच मोटार सायकलवर बसून होता व उर्वरीत दोन इसम समर्थ ज्वेलर्स दुकानात येवून कोयता व पिस्टलचा धाक दाखवून दुकानाचे मालकास  सोन्याचे दागिने बॅगेत भर अशी दमदाटी करून दोन्ही इसमापैकी काळया रंगाचे जॅकेट घातलेल्या इसमाने त्याचे हातातील कोयत्याने दुकानातील काचेचे काउंटर फोडून त्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दुकान मालक दिपक दिगंबर वेदपाठक यांनी व दुकानातील कामगारांनी आरडा-ओरड केल्याने सदरचे इराम हे निळ्या रंगाचे मोटार सायकलवरून पळून गेले, त्यावरून सदर घटने बाबत विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं.५१७/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०९ (४), ६२, ३५१(२) (३), ३२४(३) ३८५) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये दिनांक ०२/११/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.सदर दरोडयाची घटना गंभीर स्वरूपाची असल्याने तो गुन्हा उघडकीस आणणेबाबत एम राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ.अश्विनी पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा), राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार थांना मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.वरील नमुद दरोड्याची घटना घडल्याने, नमुद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 07 तपास पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन करून नमूद घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सी. सी. टी. व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्याच्या व तांत्रीक विश्लेषण करण्याच्या सुचना दिल्या.त्यानुसार गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे दत्तात्रय काळे व पोसई मुकेश गायकवाड, यांनी गुन्ह्याचे घटनास्थळा पासून सोलापूर शहरातील विविध ठिकाणांचे सुमारे 125 सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपींची ओळख पटवत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी यांना गोपनिय खात्रीशीर माहिती मिळाली की आर.टी.ओ. ऑफिस रोड वरील दिनांक 01/11/2025 रोजी समर्थ ज्वेलर्स या दुकानात जबरी चोरी करणारे 03 इसम हे बजाज प्लॅटिना कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम. एच. 13 ई. ए. 2578 घेवून यतीमखाना जवळील मोकळ्या मैदानात थांबले आहेत.वरील प्रमाणे प्राप्त गोपनिय माहितीची खात्री करून गुन्हे शाखेकडील तपास पथके व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून बजाज प्लॅटीना मोटार सायकलवरील 03 संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विचारपूस करता त्यांची नावे (1) साहिल दशरथ गायकवाड, वय-20 वर्षे, व्यवसाय बेकार, रा. भैरू वस्ती, लिमयेवाडी, सोलापूर, (2) समर्थ समीर गायकवाड, रा. भैरू वस्ती, सुशिल मराठी शाळे जवळ, सोलापूर, (3) सार्थक दशरष्ट्र गायकवाड, रा. 2 नंबर झोपडपट्टी, विठ्ठल मंदिर जवळ, सोलापूर असे असल्याचे सांगितले. पुढील तपासामध्ये साहील दशरथ गायकवाड याचेकडून अशी माहित्ती मिळाली की, दिनांक 01/11/2025 रोजी दुपारी 03.30 चे सुमारास साहील व त्याचे मित्र नागे (1) अजिंक्य चव्हाण, रा. वारजे माळवाडी, पुणे, (2) विशाल जाधव, रा. तुळजापूर, जि. धाराशिव,त्या ठिकाणी वरील सर्वांनी आरटीओ ऑफीस जवळ समर्थ ज्वेलर्स नावाचे दुकान लुटण्याचा कट केला. त्यावेळी अजिंक्य चव्हाण याने त्याचेकडे पिस्टल व 03 काडतुसे व साहील गायकवाड याने त्याचेकडील लोखंडी कोयता असे शस्त्रासह एकत्र जमून यातील आरोपी अजिंक्य चव्हाण याचे ताब्यातील विना नंबरलेटची पाढन्या रंगाची ॲक्टीव्हा गाडीची ओळख पटू नये व पोलीसांची दिशाभूल व्हावी यासाठी नमूद गाडीस निळया पेंट सोने रंगविले.त्यानंतर नमूद निळया ॲक्टीव्हा गाडीवर अजिंक्य चव्हाण, विशाल जाधव व साहील गायकवाड है तसेच समर्थ गायकवाड, सार्थक गायकवाड व विधी संघर्षीत बालक असे प्लेटिना मोटार सायकलवरून आर.टी.ओ. रोड येथील समर्थ ज्वेलर्स शॉपजवळ आले. त्यावेळी अजिंक्य चव्हाण व साहील गायकवाड है तोंडास मास्क चांधून समर्थ ज्वैलर्स दुकानात शिरले व विशाल जाधव हा दुकानाचे बाहेर गाडीवरच थांबून राहिला. तसेच उर्वरीत तिचे हे सोन्याचे दागिने लुटताना काही गडबड झाल्यास त्यांना मदत करण्यासाठी समर्थ ज्वेलर्स दुकानाचे आसपासच थांबुन राहिले.त्यानंतर अजिक्य चव्हाण व साहील गायकवाड यांनी समर्थ ज्वेलर्समध्ये प्रवेश करून, अजिंक्य चव्हाण याने त्याचे हातातील पिस्टलवा धाक दाखवून तसेच साहील गायकवाड याने दुकान मालकाकडे बैंग टाकून सोन्याचे दागिने देंगेत भर अशी दमदाटी करून हातातील कोयत्याने दुकानातील काचेचे काऊंटर फोडून त्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकान मालक यांनी चोर आले म्हणून जोर-जोरात आरडा ओरड केल्याने साहील व अजिंक्य हे दोघे घाबरून निळ्या रंगाचे मोटार सायकलवरून पळून गेले. त्यानंतर ते सर्वजण एकत्रीत लिमयेवाडी येथील समर्थ गायकवाड यांचे घरा जवळील बोळात निळया ॲक्टीव्हा गाडीचा रंग पेट्रोलने धुतला. त्याप्रमाणे नमूद इसमांना ताब्यात घेवून त्यांचे अंगझडतीत लोखंडी कोयता, बजाज प्लैटीना कंपनीची मोटर सायकल व मोबाईल फोन जप्त करणेत आले आहेत. तसेच नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामें अनिकेत पांडुरंग गायकवाड याचेकडून काळया रंगाची ॲक्टिव्हा मोटर सायकल जप्त करण्यात येवून त्त्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नमूद गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक यास त्याचे नातेवाईका सह विजापूर नाका पोलीस ठाणेस हजर राहण्यास समज दिली.त्याचप्रमाणे यातील आरोपी नामे (1) समर्थ गायकवाड व अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वी होटगी रोड, सोलापूर येथील चौधरी फिलींग सेंटर (पेट्रोल पंप) येथे पिस्टल व चाकूचा धाक दाखवून सुमारे 39,000/- रूपये जबरीने चोरले होते. त्याबाबत वळसंग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गु.र.नं.494/2025 भा.न्या.सं.क.303 (2) अन्वये दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ.अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, स.पो.नि. शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे व दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार व सायबर कडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form