सोलापूर (प्रतिनिधी)- प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर व छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड सोलापूर वतीने १० नोव्हेंबर २०२५ रोजी शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी वधदीन, शिवप्रताप दीन म्हणून साजरा करण्यात आला.रयतेचे राजे छत्रपती शिवरायांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असे स्वराज्य निर्माण केले अश्यावेळी त्यांच्या स्वराज्यात सर्व समाजाची माणसं सामील होती छत्रपती शिवरायांना शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी कपट नितीने मारण्याचा डाव आखला असता छत्रपती शिवरायांनी अश्या शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णीवर वार करून त्याची ब्रम्हहत्त्या केली. या दिवसाचे स्मरण म्हणून भारतीय रक्षक आघाडी च्यावतीने दरवर्षी प्रतापगडावर शिवप्रताप दीन साजरा केला जातो तसेच महाराष्ट्राभर विविध संघटनांच्या वतीनेही हा दिवस साजरा केला जातो याचे औचित्य साधून सोलापुरातीही शिवप्रतापदीन
साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात अशोक आगावणे कल्याण श्रावस्ती, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फारुख शेख आणि डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले बहुजनांनी ब्राम्हण्यवादी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे व छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास पुढे आणावा असे आवाहन वक्त्यांनी आपल्या भाषणात केले.या कार्यक्रमास गौस पिरजादे सलीम शेख एजाज शेख टेक्सास शिवशरण अशोक साबळे लखन काळे सुरेश बनसोडे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद यांच्यासह विशाखा उबाळे रोहिणी वाघमारे लक्ष्मी माने या महिलाही उपस्थित होत्या.

