सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून तो पत्रकारिता करत असतो पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून देखील काम करत असून समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना तो समोर आणत आहे राज्यातील अनेक पत्रकार युट्युब पोर्टल त्याच बरोबर साप्ताहिक वृत्तपत्र चालवून आपली उपजीविका करत असून तुटपुंज्या मिळणाऱ्या जाहिराती मधून पत्रकारांची कौटुंबिक गुजरान होत नाही पत्रकारिता बरोबर एखादा व्यवसाय करून पत्रकारांचे जीवनमान उंचवण्यासाठी राज्य सरकार ने प्रयत्न करायला पाहिजे राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर व्यवसाय करून आपली कौटुंबिक उपजीविका करण्यासाठी विनातारण व विनाजामीन पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्ठमंडळाने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करत राज्यसरकारकडे पत्रव्यवहार करण्याची विनंती केली आहे कोरोना महामारी नंतर राज्यातील पत्रकार प्रचंड आर्थिक नुकसानीत असून तुटपुंज्या जाहिराती तसेच अल्प मानधनामुळे पत्रकारांची अवस्था अतिशय बिकट व कठीण झाली असून लोकशाही चा चौथा स्तंभ आज मोडकळीस आलेला दिसतं आहे पत्रकारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरजअसून बँका सरकारी जामीनदार किंवा तारण ठेवल्याशिवाय कर्ज देत नाहीत अश्या वेळी पत्रकारांना कर्ज घेतेवेळी कोणीही जामीन देत नाही त्याच बरोबर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तारण म्हणून काहीच नसल्याने राज्यातील पत्रकारांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील पत्रकारांना पाच लाख रुपये कर्ज देणे बाबत बँका ना आदेश दयावा जेणेकरून पत्रकार बांधवाना आर्थिक परिस्थितीतून सावरता येईल तसेच राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे पत्रकारांची आर्थिक कोंडी देखील सुटणार आहे त्याच बरोबर पत्रकारांना समाजात ताठ मानेने जगता येईल राज्य सरकार ने पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी विनंती देखील निवेदनात केली आहे.यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे इम्रान आत्तार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी रेहमान जहागीरदार उपस्थित होते.
