युवकाच्या बँक खात्यामधून ७ लाख गायब ; पोलीसात तक्रार दाखल




 करमाळा (प्रतिनिधी) विशाल जाधव -  एका युवकाच्या  बँक खात्यातून ७ लाख रुपये ऑनलाईन पध्दतीने काढून फसवणूक करण्यात आली. ही घटना करमाळा येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. अजय नवनाथ कांबळे (रा. भिमनगर, करमाळा) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अजय कांबळे यांच्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली आणि फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form