सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने दर शुक्रवारी राबविण्यात येणारी आजोरा उचल मोहीम दि. 21/11/2025, शुक्रवार रोजी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली.कालच्या मोहिमेमध्ये शहरातील विविध महत्त्वाच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आजोरा उचल, कचरा संकलन व स्वच्छता कामे करण्यात आली. मोहिमेचा व्याप्ती विशेषतः खालील परिसरांमध्ये होती जुना पुना नाका,शेळगी गावठाण,शेळगी जिल्हा परिषद परिसर,शेळगी ब्रिज,एकता नगर रोड ते श्रीकृष्ण मंगल कार्यालय,एम.आय.डी.सी. रोड – विमानतळ परिसर,म्हाडा कॉलनी,डी-मार्ट रोड ते गोविंदश्री मंगल कार्यालय,सहयोग नगर,नवोदय नगर,मीरा पिठाची गिरणी कंबर तलाव मैदान,वसंत नगर कॉर्नर – रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर,दमाणी नगर,मरीआई चौक
जेल रोड परिसर,डफरीन हॉस्पिटल,शानदार चौक
मोहिमेसाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री व मनुष्यबळ तैनात करण्यात आले. 11 जेसीबी, 20 डंपर यांच्या मदतीने दिवसभरात एकूण 83 खेपा घेऊन प्रचंड प्रमाणावर आजोरा व दूषित कचरा उठाव करण्यात आला.या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार प्रत्यक्ष उपस्थिती राहून मार्गदर्शन केले यावेळी सफाई अधिकारी (वाहन) अनिल चराटे, तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक उपस्थित राहून मार्गदर्शन केले.महापालिका प्रशासन शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
सोलापूर