माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाहीर प्रवेश



सोलापूर (प्रतिनिधी)- माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाचे नेते आप्पाशा म्हेत्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात संपर्कप्रमुख अण्णा बनसोडे यांच्या समक्ष कार्यकर्त्यांसह 29/11/2025 रोजी जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आनंद मुस्तारे आदी उपस्थित होते. यावेळी आप्पाशा म्हेत्रे यांनी पक्षाला ग्वाही देताना म्हणाले की सोलापूर शहरातील प्रत्येक भागात फिरून माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्याचे प्रयत्न करू. तसेच पक्ष संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न करून येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे संपर्कप्रमुख व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना ग्वाही देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form