सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूरच्या विकासात्मक धोरणासाठी अभ्यासू कायदेतज्ञ वकिली पेशा जोपासत गेल्या १0 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात तळमळीने अन्याया विरुद्ध झटणारा अशी ख्याती ज्यांची आजवर राहिली आहे असे ॲड.अखिल शाक्य हे जनतेतून,चाहता वर्ग तसेच त्यांच्या कार्यकर्त्यां मधून रेटा आल्याने स्थानिक स्वराज संस्था निवडणूक सोलापूर महानगरपालिका 2025 मधे प्रभाग क्रमांक 23 मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याचे निश्चित झाल्याने प्रभाग 23 मध्ये अनेक मातब्बर आणि इच्छुकांची कोंडी होणार हे मात्र नक्कीच , ॲड.अखिल शाक्य यांचा आंबेडकरी चळवळीचा पार्श्वभूमी असून एक खमके नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे गेल्या १० वर्षांपासून बघितले जात आहे. त्यांनी प्रभाग तथा सोलापूरच्या विकासात्मक धोरणांसाठी महापालिकेच्या मैदानात उतरत असल्याचे दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना सांगितले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहरातील उदासीनतेच्या राजकारणामुळे सोलापूर शहराचा विकास रखडून आहे आज जवळपास निम्मे सोलापूर शहर जिल्ह्यातील युवक युवती ही पुणे मुंबई अशा ठिकाणी पोटाची खळगी भरविण्यासाठी जात आहेत
ही एक सोलापूरची मोठी शोकांतिका आहे असे ॲड.शाक्य म्हणाले.पुढे बोलताना म्हणाले की किमान मी या निवडणुकीत निवडणून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 23 चा कायापालट करणार असून ज्या काही गोष्टी प्रभागात आजवर झाले नाहीत त्या मूलभूत सुविधा जनतेला देण्यासाठी मी समर्थपणे आणि ठामपणे काम करण्याची इच्छा दर्शविल्याने आता प्रभाग क्रमांक 23 मध्ये अभ्यासू आणि सुप्रसिद्ध वकील उमेदवारी देत असल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसतील हे नक्कीच.


