अजित बनसोडेंच्या प्रवेशाबाबत ठपका ठेवत राष्ट्रवादीच्या खंदे समर्थकांची सोलापूरात रात्रीच्या दरम्यान पक्ष बदलू धोरण ; भाजपात प्रवेश

 


सोलापूर (प्रतिनिधी)- अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी एका रात्रीत पक्ष बदलला आहे. पक्षातील कुरघोडी यासाठी कारण ठरत असल्याचे सांगितले जात आहे. किसन जाधव यांनी मध्यरात्री आपला राजीनामा पत्र सादर करत त्यामध्ये तसा उल्लेख देखील केला आहे. आपल्या मनातील खदखद त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा त्याग करत असल्याचे सांगितले आहे. पत्रातील म्हणणे जस्यास तसे वरील विषयास अनुसरुन मी राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वेगवेगळया पदावर पक्षसंघटनेचे कामकाज प्रामाणिकपणे पार पाडत आलेलो आहे. परंतू राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सोलापूर शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आम्ही ज्या भागात प्रतिनिधीत्व करतो तो प्रभाग क्र. २२ येथील महानगरपालिका निवडणूक लढविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. येथील सामाजिक, राजकीय परिस्थितीला आम्ळांस मनपा निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने आमच्या प्रभागातील मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश अजित बनसोडे व इतरांचा पक्ष प्रवेश आम्हांस विश्वासात न घेता व वरिष्ठांना दिशाभूल करुन पक्षप्रवेश करुन घेतला. आम्हांस सो.म.पा. निवडणुक लढविण्याचे आहे. यापुर्वीही देखील सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी माझे विषयी व माझे सहकारी नागेश (अण्णा) गायकवाड यांच्या बाबत वरिष्ठांना चुकीची माहिती पुरवित आहेत त्या अनुषंगाने कांही कारणांस्तव मी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व सदस्यत्व या पदाचा राजीनामा देत असून त्याचा स्विकार करावा ही विनंती.आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेतेमंडळी पक्षातल्या बदली करण्यासाठी तत्पर असल्याचे दिसत आहेत. येणाऱ्या काळात शहर उत्तर आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अनेक नेते मंडळी पक्ष बदलणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form