"गॅस सिलेंडर" ने भरवली धडकी..!!


सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ ही अत्यंत चुरशीची ठरत आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या सगळ्यात जास्त आहे. ३७ उमेदवार रिंगणात उभे आहेत. अत्यंत संवेदनशील व चुरशीची लढत या प्रभागामध्ये दिसून येत आहे. सर्व दिग्गज प्रस्थापित भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभे असताना "वंचित बहुजन आघाडी" ने सगळ्यांना घाम फोडला आहे. सामान्य जनतेतून मिळत असलेला जनाधार, अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांचा असलेला रोष दिसून येत आहे. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसून येईल अशी शक्यता परिसरातून वर्तवण्यात येत आहे.यातून अनपेक्षित निकाल लग्नाची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्व पक्षातील अधिकृत व अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक २२ चा परिसर पिंजून काढण्यात व्यस्त आहेत. एकूण ४१,०३२ लोकसंख्या असलेल्या या प्रभागामध्ये अनुसूचित जाती १०,९९९ व अनुसूचित जमाती ७९७ एवढी लोकसंख्या आहे. या परिसरात मागासवर्गीय व मुस्लिम बहुल भागातील मतदान निर्णय ठरू शकते. भटक्या विमुक्त जाती जमाती आपले विशिष्ट मतदार राखून आहेत.
सोलापूर शहरातील हा प्रभाग सर्वात मोठे क्षेत्रफळ, लोकसंख्या व उमेदवार असलेला आहे. इथून धक्कादायक "नवीन" निकाल लागू शकतात अशी शक्यता सध्या तरी सर्व स्तरातून वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form