सोलापूर (प्रतिनिधी)- आस्था रोटी बँकेतर्फे आज 23 फेब्रुवारी संत गाडगेबाबा महाराज यांचे 150 वी जयंती निमित्त प्रथम दत्त चौकामधील संत गाडगेबाबा महाराज यांच्या मूर्तीस आज पूजा करण्यात आली संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता मोहीम करण्यात आली व तसेच सिविल हॉस्पिटल मधील गोरगरीब गरजू लोकांना व तसेच पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले संत गाडगेबाबा महाराज समाज सुधारक समाजासाठी खूप मोठे योगदान दिलेला आहे.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंकज जाधव साहेब व सिद्धेश्वर कळकेरी व तसेच ब्लड बँकेचे विनायक कुलकर्णी आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छचुरे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली.आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते विनोद भोसले दत्तात्रय दळवी अनिता तालीकोटी गीता दळवी विजय छचुरे इतर कार्यकर्ते उपस्थितीत होते२३ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त सोलापूर विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम, अन्नदान आणि समाजप्रबोधनपर उपक्रम आयोजित केले जातात. 'स्वच्छता हीच सेवा' व 'देव माणसात आहे' हा संदेश देत, हातात खराटा घेऊन परिसर साफ करणे आणि गरजूंना अन्नदान करणे यातून गाडगेबाबांचे विचार प्रत्यक्षात आणले जातात वव्यसनमुक्ती व जनजागृती: कीर्तनातून अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि जातीभेद यांविरुद्ध प्रबोधन केलेसंत गाडगेबाबांनी आयुष्यभर समाजातील अज्ञान व अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वतः झाडू हातात घेऊन कार्य केले, त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता आणि सेवा हेच खरे अभिवादन ठरते.“स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांना जयंतीदिनी कोटी कोटी ...“स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या कार्यातून समाजसेवेची प्रेरणा घेत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे अशा समाज सुधारक थोर पुरुषांचे कार्य पुढे नेत आहे
