कुमार करजगी यांचे आरोप खोटे ; बदनामी केल्याप्रकरणी कडक कारवाई व तडीपारीची मागणी : डॉ.संदीप आडकेंची माहिती


सोलापूर (प्रतिनिधी)- कुमार शंकर करजगी, राहणार सोना शंकर निवास, बाळे, बार्शी रोड, सोलापूर, हा इसम आमच्या जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर या ट्रस्टच्या 137 एकर जागेच्या भूखंड घोटाळ्यात फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार आर.सी.सी. 594 / 2017 या केस मध्ये मा. उच्चलयाने ठरवलेल्या काही अटींवर व शर्तीवर बाहेर आहे.सदर इसमाने दि. 23 जानेवारी 2026 रोजी पत्रकार परिषद घेऊन डॉ. संदीप आडके हे खोट्या कागदपत्रावर सदर संस्थेचे सभासदांची व अनेक सरकारी खात्यांमध्ये फसवणूक करत आहेत व त्यांनी 5 जानेवारी 2026 रोजी पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर येथे त्यांचे सहकारी सतीश रजपूत यांच्याकडे कुमार करजगी वरील सर्व केसेस मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे असा खोटा दावा केलेला आहे व त्याबाबत पुराव्यासहित आपणाकडे त्यांनी तक्रार दाखल केल्याचे सुद्धा सांगितलेले आहे. सदर बाब ही धादांत खोटी असून यामध्ये माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व अतिशय उच्चशिक्षित अस्थिरोग तज्ञाची नाहक बदनामी झालेली आहे व सदर मजकूर सोलापुरातील अनेक वृत्तपत्रे व youtube मीडियावर प्रसारित करण्यात आलेला आहे त्यामुळे 5 जानेवारी 2026 चे संपूर्ण दिवसाचे सोलापूर आयुक्त कार्यालय व गुन्हे शाखा येथील सीसीटीव्ही फुटेज आपण त्वरित हस्तगत करून ते मला द्यावे व पुढील कोर्ट व कार्यालयीन कामासाठी जतन करून ठेवावे.

2. कुमार करजगी व त्याच्या साथीदारांनी आमच्यावरील ट्रस्टच्या 1988 सालापासून 137 एकर जागेमध्ये खोट्या कागदपत्राद्वारे सर्व सरकारी खात्यांना फसवून व संगनमताने करोडो रुपयांची फसवणूक केलेली आहे. तसेच अशा प्रकारचे खोटे गुन्हे त्याने याआधी माझ्यावर व माझ्या ट्रस्टच्या अनेक सहकाऱ्यांवर दाखल केलेले आहेत. कुमार करजगी वर याआधी सुद्धा मारहाण, दमदाटी, खोट्या कागदपत्रांवर जागेचे व्यवहार करणे, वेश्याव्यवसाय करणे, Samarth Co-oprative Bank Scam व मागील महिन्यामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये भर न्यायाधीशांसमोर मला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आपणाकडे व सोलापुरातील विविध पोलीस चौक्यांमध्ये नमूद आहे. सदर व्यक्तीला त्याने वारंवार जामीनाच्या अटी मोडल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने 11 फेब्रुवारी 2025 रोजी येथून पुढे अशा गोष्टी करू येत अशी सक्त ताकीद दिलेली आहे 3. कुमार करजगी हा कोणतेही अधिकार नसताना आमच्या ट्रस्टच्या जागेमध्ये सर्कस, एक्झिबिशन, फूड फेस्टिवल व लोकांना जागा विकण्याचे प्रकार सातत्याने करत आहे व त्याविरुद्ध सुद्धा वारंवार पोलीस तक्रारी दिल्या असताना सुद्धा त्याच्यावर कोणतेही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचमुळे आज ह्या गुन्हेगाराची माझ्यासारख्या अतिशय प्रतिष्ठित डॉक्टरला खंडणी मागितली म्हणून बदनामी करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. प्रत्येक तक्रारीनंतर हा पोलीस खात्यातील अनेकांना मॅनेज करून आपल्यावरच्या तक्रारी दाखल होऊ देत नाही व आमच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करतो हा इसम समाजाला घातक ठरलेला आहे. या इसमांकडून मला माझ्या कुटुंबाला व माझ्या ट्रस्ट मधील अकराशे सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांच्या जीवाला घातक ठरलेला आहे. अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये लिप्त असलेल्या कुमार शंकर करजगी व त्याच्या हस्तकांना तात्काळ स्थानबद्ध अथवा तडीपार करावे. तसेच न्यायालयाला कळवून त्याचा जामीन त्वरित रद्द करावा.अशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्त यांना डॉ.संदीप आडके यांनी दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं

Post a Comment

Previous Post Next Post