'शहर मध्य'मध्ये बौद्ध समाजावर अन्याय ; आमदार देवेंद्र कोठे न्याय देणार का?



सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूरच्या शहर मध्य या मतदारसंघात सर्वाधिक मागासवर्गीय मतदार आहेत. त्यामध्ये विशेष करून बौद्ध समाजाचे मतदान निर्णायक ठरते. जानेवारीमध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत 102 नगरसेवकांपैकी केवळ सहा बौद्ध समाजाचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये शहर उत्तर तीन आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रत्येकी तीन तीन नगरसेवक निवडून आले. गौतम कसबे, वंदना गायकवाड, नारायण बनसोडे, दत्तात्रय नडगिरी, संगीता जाधव, सुजीत वाघमोडे या सहा बौद्ध समाजाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. शहर मध्य या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मतदारसंघात बौद्ध समाजाचा नगरसेवक झाला नाही. त्यांच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत युवा नेते रवी कोळेकर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यांचे प्राबल्य असलेल्या भागात त्यांनी कोठे यांना मोठे मतदान मिळवून दिले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी रवी कोळेकर यांनी प्रभाग 21 मध्ये आपली तयारी केली होती. प्रत्येक नागरिकाच्या संपर्कात ते राहिले होते परंतु त्या प्रभागात अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्याने त्यांचाही नाईलाज झाला. त्यांनी त्यांच्या आईसाठी प्रयत्न केला पण तिथे आमदार सुभाष देशमुख यांनी अनुसूचित जाती महिला ही जागा स्वतःकडे घेण्यात यश मिळवले त्यामुळे कोळेकर यांच्यावर अन्याय झाला.आमदार देवेंद्र कोठे यांच्या शब्दावरून त्यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आणि कोठे जे सांगतील ते काम केले. प्रभाग 21 मध्ये तीन नगरसेवक हे बाहेरचे आहेत. त्यांचा कोणताही संपर्क नाही, त्यांना कुणी ओळखत नाही अशी लोक या ठिकाणी निवडून आली आहेत. त्यामुळे निश्चितच स्थानिकांवर अन्याय झाला आहे. आता भाजपकडून नऊ नगरसेवक हे स्वीकृत होणार आहेत. त्यामध्ये बौद्ध समाजाचा चेहरा रवी कोळेकर यांना देवेंद्र कोठे न्याय देणार का अशी चर्चा समाजातून सुरू आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post