देहूरोड (प्रतिनिधी)- महात्मा फुले यांचा फेटा म्हणजे ही राष्ट्राची संपत्ती आहे, देशाचे वैभव आहे या राष्ट्राच्या संपत्तीने आणि देशाच्या वैभवाने तुमचा सन्मान झाला आहे. माझ्या हस्ते तुमचा झालेला सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने मी श्रीमंत झालो आहे.क्रांतिबाचा फेटा ही फुल्यांच्या विचाराची श्रीमंती आहे- असे प्रतिपादन धम्मरत्न प्रबुद्ध साठे यांनी केले. ऐतिहासिक धम्मभूमिवर प्रबुद्ध रंगभूमिच्या ४८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या म.फुले फेटा प्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबुद्ध रंगभूमीचे प्रवर्तक भीमपुत्र टेक्सास गायकवाड हे होते.प्रबुद्ध रंगभूमिचे विश्वस्त जगन्नाथ गुंजाळ यांना प्रबुद्ध साठे यांच्या हस्ते क्रांतिबा महात्मा जोतिबा फुलेंचा फेटा, पंचशील आभूषण सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.भा. प्रबुद्ध नाट्य परिषदेचे डॉ.कीर्तिपाल गायकवाड यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत ॲड.क्षितिज गायकवाड यांनी केले. महात्मा फुलेंचा फेटा आणि सन्मानचिन्ह स्विकारून सत्काराला उत्तर देताना जगन्नाथ गुंजाळ यांनी, आपण केलेले बौध्द धर्मांतर व सामाजिक कार्य, याचा ऐतिहासिक धम्मभूमी वर झालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी हा सन्मान म्हणजे टेक्सास दादाच्या मैत्रीचा गौरव असल्याचे नमुद केले. यावेळी जुगन्नाथ गुंजाळ यांच्या कार्याचा गौरव करतांना संजय चव्हाण शिवराज वाघमारे, भीमदास आरु, मीनाताई गायकवाड, रंजनाताई सोनवणे, मंदाकिनीताई भोसले डॉ.मिलिंद तायडे, अशोकराव गायकवाड, पत्रकार राहुल खांडेकर, ॲड बाबा वानखडे, बापूसाहेब गायकवाड राजाभाऊ गायकवाड,कवी. मंगलदास पडवेकर यांनी सदिच्छापर आपले विचार व्यक्त केले. यावेळी अभिनेते आनंदकुमार सरवदे, धर्मानंद चव्हाण, भीमदास आरु, भारत भगत, रोहन पगारे यांची प्रबुद्ध रंगभूमी विषयी भाषणे झाली. प्रमुख वक्ते डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी प्रबुद्ध रंगभूमीच्या चार दशकाच्या कार्याचा आढावा विस्तृतपणे घेतला.तर अध्यक्षीय भाषणात भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी, जगन्नाथ गुंजाळ यांच्या त्यागामुळे त्यांना हा सन्मान मिळाला असल्याचे सांगून योग्य मित्राला हा म.फुले फेटा प्रदान होत असल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.यावेळी सत्कारार्थी जगन्नाथ गुंजाळ यांच्या जीवनावर रंजना सोपवणे आणि मंगलदास पडवेकर यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर प्रबुद्ध रंगभूमी, अ.भा.प्रबुद्ध नाट्य परिषद, बुद्ध विहार कृती समिती, धम्मभूमी महिला संघ, ज्येष्ठ उपासक संघ आणि बहुजन संघटक चॅनेलच्या वतीने जगन्नाथ गुंजाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास रिपाई नेते सुरेश गायकवाड, यशवंतराव गायकवाड, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटीचे प्रा.नितीन कांबळे सर, यमराज इंगळे, सुदाम कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. धम्मपालन गाथेने व स्नेहभोजनाने कामाची सांगता झाली.
क्रांतिबाचा फेटा ही म.फुल्यांच्या विचारांची श्रीमंती आहे : जगन्नाथ गुंजाळ यांना प्रदान : ऐतिहासिक धम्मभूमिवर प्रबुद्ध रंग भूमिचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
byदैनिक लोकशाही मतदार
•
0
Tags:
पुणे
