आष्टा (प्रतिनिधी)-ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' अभियान (टप्पा क्र. १) राबविण्यात येत आहे. अपर तहसील कार्यालय, आष्टा अंतर्गत विविध मंडळांमध्ये मार्च ते मे २०२६ या कालावधीत ही शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिली.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे व वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.या शिबिरांमध्ये फेरफार प्रकरणांचा निपटारा, सातबारा व इतर अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा, अकृषक (NA) प्रकरणांबाबत मार्गदर्शन, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान योजना तसेच तक्रार निवारण यावर विशेष भर दिला जाणार आहे
Tags:
सांगली
