कंदर - सातोली रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा ६ मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा : चार वर्षापासून रस्ता अर्धवट

 


सोलापूर(प्रतिनिधी)-.करमाळा तालुक्यातील कंदर- सातोली हा अडवलेला शिवरस्ता तातडीने दुरुस्त करून देण्यात यावा अन्यथा ६ मार्च रोजी याच रस्त्यावर आत्मदहन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.महाराष्ट्र शासनाने पानंद रस्ते, शिवरस्ते बाबत शासन निर्णय (जीआर) जारी केलेले आहेत. त्यामध्ये मुख्यतः शेत रस्ते, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, शिवरस्ते आणि पाऊल रस्त्यांच्या हक्काबाबत शेतकऱ्यांमध्ये वाद-विवाद निर्माण झाल्यास त्याबाबत चौकशी करून योग्य तो आदेश आणि निर्णय देण्याचे अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत. मात्र तहसीलदार ने हा प्रॉब्लेम सॉल न केल्यामुळे शेतकऱ्यावरती आत्मदहनाची वेळ आली आहे.शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , कंदर सातोली हा शिवरस्ता पारंपारिक असून या रस्त्यावर आमच्या शेत, घर व शाळा आहे परंतु गेल्या तीन वर्षापासून या रस्त्यावर काही संबंध नसणाऱ्या संतोष फरतडे व बिभीषण उर्फ दादा फरताडे यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांची अडवणूक करून येथे असणाऱ्या ओढ्यातील वाहून गेलेला रस्ता भरण्यास अडथळा केला आहे. त्याचप्रमाणे पुढे जाणारा हा रस्ता गणेश फरतडे व दीपक फरतडे यांनी हा रस्ता अत्यंत अरुंद केला असून तो भरण्यास अडथळा करत आहेत. त्यामुळे हा रस्ता बंद पडला आहे. या संदर्भात प्रांत अधिकारी यांच्याकडे 2023 पासून तक्रार करूनही अद्याप पर्यंत या रस्त्याची पाहणी करण्यात आलेली नाही. किंवा मदत केली नसल्यामुळे आमचे आर्थिक, शैक्षणिक मोठे नुकसान झाले असल्याने, आम्हाला जगणे नकोशी झाले आहे. त्यामुळे सहा तारखेपर्यंत हा रस्ता भरून द्यावा अन्यथा सहा मार्च शुक्रवार रोजी कुटुंबासह याचा रस्त्यावर आत्मदहन करणार असल्याचे नागनाथ चव्हाण, सिद्धेश्वर गोडसे,हनुमंत साळुंके, राजेंद्र जगताप, सचिन जाधव, दशरथ बारबोले, शिवाजी साळुंके अजित फरताडे , संतोष पवार यांनी सह कुठून करणार असल्याचे कळवण्यात आले आहे. या रस्त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यासह पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेल्या आहे



Post a Comment

Previous Post Next Post