राज्यस्तरीय "पर्यावरण मित्र" विकासरत्न पुरस्कार राम हुंडारे यांना सिने अभिनेत्री मिनाक्षी पाखरे यांच्या हस्ते प्रधान

 


ठाणे (प्रतिनिधी) :- समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय "विकासरत्न प्रेरणा पुरस्कार व समृद्धी कला सादरीकरण सोहळा २०२६ हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली (पूर्व), मुंबई येथील अशोक सावंत हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत आकर्षक आणि संस्मरणीय ठरला या पुरस्कार सोहळ्यामध्ये सोलापूर येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी राम हुंडारे यांना राज्यस्तरीय "पर्यावरण मित्र" विकासरत्न प्रेरणा पुरस्कार 2026 सिने अभिनेत्री मिनाक्षी पाखरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. राम हुंडारे हे सारा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक, पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा अध्यक्ष, पोलीस मित्र असोसिएशन जिल्हा अध्यक्ष तसेच इको नेचर क्लबचे राज्य समन्वयक आहेत. त्यांनी गेली ५ वर्षे कोरोना सारख्या महामारी नंतर समाज सेवे मधे सक्रिय सहभाग घेऊन इको नेचर क्लबच्या माध्यमातून डॉ मनोज देवकर यांच्या सोबत राहून सोलापूर जिल्हा व परिसरातील विविध शाळा, मंदिर परिसर, पोलीस स्टेशन, स्मशान भूमी, मोकळी जमीन, रोड लगत अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण करुन व वृक्ष संवर्धन करण्याचे काम करत आहेत. यापुर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाने "माझी वसुंधरा" अभियानाअंतर्गत त्यांचा सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरण क्षेत्रांतील योगदान लक्षात घेऊन राम हुंडारे यांना हा राज्यस्तरीय "पर्यावरण मित्र विकास रत्न प्रेरणा पुरस्कार" देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन समृद्धी पर्यटन सांस्कृतिक सेवा विकास ट्रस्ट संस्थापिका अध्यक्षा मिनाक्षी पाखरे, सचिव महेश महादेव पाखरे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त जेष्ठ साहित्यिका डॉ अलका नाईक, पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक, अँडव्होकेट बाळासाहेब तोरस्क्रर, चेअरमन ग्रीण्डलेज फार्मासुटीकल प्रा. लि. रामकृष्ण कोळवणकर, डॉ रावसाहेब घोडेराव आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post