लक्षवेधी | सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करी रोखणे नूतन जिल्हाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान


सोलापूर (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील नदीपात्रांमधून सुरू असलेली वाळू तस्करी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असून, नव्याने रुजू झालेल्या एस.कार्तिकियेन जिल्हाधिकाऱ्यांसमोर हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भीमा, सीना, माण या नद्यांच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत.रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, डंपरच्या माध्यमातून वाळूची चोरी केली जात असून, यामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे. तसेच नदीपात्रांची नैसर्गिक रचना बिघडून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. स्थानिक ग्रामस्थांकडूनही या प्रकारांविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.यापूर्वीही महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, तस्करांकडून नवनवीन पद्धती वापरून वाळू उपसा सुरूच असल्याने कारवाईला अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे.नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी एस कार्तिकियेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध वाळू तस्करी रोखण्याचे मोठे आवाहन आता जिल्हाधिकारी यांच्यासमोर आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post