सोलापूर- सोलापुरातून हैदराबादसाठी 17 एप्रिल रोजी पहिले विमान उड्डाण करणार आहे. त्यासाठी 3800 रुपये मोजावे लागणार आहेत. सोलापुरातून गोवा, मुंबई, इंदूरनंतर आता हैदराबादला विमानसेवा सुरू होत असून, त्यामुळे दक्षिण भारताचा प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत झाली आहे. शुक्रवारपासून (दि. 3) तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. या मार्गावर सोमवार ते शुक्रवार दरम्यान नियमित उड्डाणे असणार आहेत. फ्लाय 91 कंपनीकडून सोलापूर-हैदराबाद विमानसेवा 17 एप्रिलपासून सुरू होत असल्याने गोवा विमानसेवेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कंपनीकडून देण्यात आली.गोव्याहून सकाळी सोलापूरला येणारे विमान पुढे दुपारी हैदराबादला जाणार आहे. तेच विमान सायंकाळी सुमारे पाच वाजेपर्यंत हैदराबादहून परत सोलापूरला येईल आणि त्यानंतर गोव्याकडे रवाना होणार आहे.
आता हैदराबाद अवघ्या काही तासांवर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवा सुरू, ३८०० रुपयांत प्रवास
byदैनिक लोकशाही मतदार
•
0
