सोलापूर (प्रतिनिधी)- दैनिक सांजचे संपादक अविनाशजी कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. पत्रकार कृती समिती, अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार तसेच पत्रकार बांधवांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी मा. अविनाशजी कुलकर्णी यांचा पारंपरिक पद्धतीने टोपी, शाल व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पत्रकारिता क्षेत्राला मिळालेल्या बळकटीचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाला तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतातून मा. कुलकर्णी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक केले.याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना अविनाशन कुलकर्णी यांनी उपस्थितान पत्रकारिता कशी असावी आणि कोणत्या पद्धतीची समाजहित पत्रकारित केली पाहिजे या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, नितीन करजोळे, युनुस अत्तार, गिरमल्ला गुरव, राम हुंडारे, अक्षय बबलाद, किर्तीपाल गायकवाड, सलाउदीन शेख, विश्वनाथ बिराजदार, नितीन कांबळे, अशोक ढोणे, अक्बर शेख, सोहेल जहागिरदार, अश्फाक शेख, नरेंन कांबळे, सिद्धार्थ भंडकुबे यांच्यासह अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार, पत्रकार बांधव व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत अविनाशजी कुलकर्णी यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, शुभेच्छा दिल्या. संपूर्ण सत्कार सोहळा आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

