सोलापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्री जल्लोष

 


सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात मध्यरात्रीपासूनच उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी आंबेडकर अनुयायांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला.शहरातील विविध भागांमध्ये बॅनर, पोस्टर व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री १२ वाजताच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पूर्णाकृती पुतळ्याकडे भीम अनुयायी जमा होत फटाक्यांची आतषबाजी करत “जय भीम”च्या घोषणा देण्यात आल्या. अनेक ठिकाणी आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तरुणाईचा उत्साह विशेषतः लक्षवेधी ठरला. हॉलच्या तालावर तरुणाई थिरकली युवकांनी जयंतीचा आनंद साजरा केला. काही सामाजिक संस्थांच्या वतीने रात्रीच मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला.यावेळी पोलिस प्रशासनानेही योग्य बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. एकूणच सोलापूर शहरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मध्यरात्रीपासूनच उत्साह, एकता आणि अभिमानाचे वातावरण सोलापूरकरणी अनुभवायला

Post a Comment

Previous Post Next Post