सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापुरातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मान्यवरांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा पुरस्काराने सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब आहे. अनुभव प्रतिष्ठानचे हे कार्य स्तुत्य असून, समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रतिष्ठान करीत आहे, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र मायनाळ यांनी काढले.
अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘अनुभव रत्न पुरस्कारां’चा वितरण सोहळा रविवारी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात उत्साहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे उपाध्यक्ष श्री. अनिकेत चनशेट्टी, युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती पूजा बाजपेयी, त्वचारोग व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. सोनाली सिद्धाराम बगले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी, महिला अध्यक्ष श्वेता कालदीप आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन गणेश येळमेली यांनी केले, तर आभार सुनंदा भाईकट्टी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद भाईकट्टी, शिवानंद नागणसुरे, गणेश कालदीप, सोमनाथ कालदीप, अभिषेक दुलंगे, धनंजय ममदापुरे, मल्लिनाथ गादगी,मंगेश कुलकर्णी,महेश कासट, ओंकार कालदीप, राहुल तंबाके, राहुल
बऱ्हाणपुरे,राहुल बिराजदार,आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला ‘अनुभव रत्न’ पुरस्काराने गौरव!
यावेळी गोपाल सोमाणी (समाजसेवक), शशिकांत आकळवाडी (उद्योजक), डॉ. दिपाली लोणीकर (डॉक्टर), अविनाश कुलकर्णी (पत्रकार), विपुल मिरजकर (कलाक्षेत्र), संतोष पाटील (शिक्षक), स्वप्नाली देवकाते (इंजिनियर), प्रशांत कुलकर्णी (वकील) आणि राणी झांबरे (महिला पोलीस) आदी मान्यवरांचा ‘अनुभव रत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. “कर्तृत्वाचा सन्मान आणि समाजाला प्रेरणा देण्याचा हा उपक्रम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मानस प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.”
Tags:
सोलापूर