उजनी आता जिवंत होणार, उपयुक्त पाणी साठ्यात भर पडायला सुरुवात..

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरण उणे पाणीसाठ्यातून बाहेर पडले असून मंगळवारी पहाटे धरणातील पाणीसाठा चल स्वरूपात वाढण्यास सुरूवात झाली. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी मानल्या जाणा-या उजनी धरणातील पाणीसाठा उणे ३६ टक्क्यांपर्यंत खालावला होता.महिनाभरात २० टीएमसी एवढा पाणीसाठा वाढलेल्या या धरणात सध्या एकूण ६३.६९ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.एकूण १२३ टीएमसी इतक्या प्रचंड पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या उजनी धरणात गेल्या डिसेंबर्यंत शंभर टक्के पाणीसाठा होता. परंतु त्यानंतर नियोजनशून्य पाणी वाटपामुळे धरणात अल्पावधीतच तब्बल ६० टीएमसी पाणी फस्त झाले होते. त्यानंतर पुन्हा सुमारे २० टीएमसी पाणीसाठा रिता झाला होता.दरम्यान, भीमा खो-यात पडणा-या पावसामुळे उजनी धरणात पाणीसाठा संथगतीने का होईना, वाढत आहे. सध्या दौंडमार्गे १२ हजार २५५ क्युसेक विसर्गाने उजनी धरणात पाणी मिसळत आहे. तर पुण्यातील बंडगार्डन येथून दौंडच्या दिशेने ८४३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पहाटे पाचच्या सुमारास धरण उणेमधून उपयुक्त पाणी साठ्यात भरण्यास सुरूवात झाली.



 सकाळी धरणात उपयुक्त पाणीसाठा एक टक्का (अर्धा टीएमसी) होता. गतवर्षी १२ जुलै रोजी धरणात चल पाणीसाठा भराण्यास सुरूवात झाली होती. यंदाच्या वर्षी चल पाणीसाठा जमा होण्यास १९ दिवसांचा विलंब लागला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form