दैनिक_लोकशाही_मतदार
निसर्गाने प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क दिला आहे. त्या प्रत्येक जीवाची काळजी येणारे काही अवलिया समाजात असतात, त्यांची मनुष्य जीवांबरोबरच जमिनीवर सरपटणाऱ्या वन्यजीवांच्या जगण्याचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी कायम धडपड सुरू असते भीमसेन लोकरे नावाचा असाच एक अवलिया मागील १६ वर्षांपासून,सापापासून नागरिकाच्या आणि नागरिकांपासून सापांच्या जीवाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे.इ. चौथीत असतानाच, सापाविषयी माहितीचा प्रकल्प शिक्षकांनी करावयास सांगितला. पुढे दहावीनंतर सर्पमित्र असलेले अजयकुमार साळवे (मामा) यांच्या सोबतीने सर्प पकडण्याची त्याला संधी मिळत गेली. दोन वर्षांच्या कालखडात सर्प पकडण्याची कला अवगत केलेल्या भीमसेनला नुकताच जागतिक सरिसर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांच्या हस्ते हिंगोली येथे "द रियल हिरो" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व तसेच सोलापूरात लोकमत समूहाकडून "गार्डीयन ऑफ नेचर" व शहिद अशोक कामटे बहुउद्देशिय मागासवर्गीय विकास संस्थेच्या वतीने "समाज भूषण" पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सर्प पकडून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केल्याचा आणि दुसरीकडे नागरिकांच्याही जीवांचे रक्षण केल्याचा आनंद त्याला सुखावत होता. म्हणूनच सोलापुरातील सर्पमित्रांना एकत्रित करून 'निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटना स्थापन करण्यात आले.
नवोदित सर्पमित्रांना सोलापूर चे सर्पअभ्यासक राहुल शिंदे यांच्या"महाराष्ट्रातील साप ' या पुस्तकामुळे विविध जातीच्या सापाची वैशिष्ट्ये समजतात व याचा फायदा प्रत्यक्ष काम करताना होतो अशी माहिती भीमसेन ने दिली. आज पर्यंत ७ हजारांहून अधिक सर्पांना जीवदान देणाऱ्या भीमसेन ने आज निसगप्रेमी सर्पमित्र संघटनेच्या माध्यमातून सोलापुरात प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सापांविषयी माहिती, महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रबोधन व जनजागृती करण्याचा उपक्रम सतत करत असल्याची कबुली या वेळी भीमसेन ने दिली. निसर्गप्रेमी सर्पमित्र संघनेचे भीमसेन संस्थापक असून त्यांच्या संस्थेत अध्यक्ष म्हणून सर्पमित्र रविचंद्र स्वामी, श्रीकांत बनसोडे, अशरफ शेख, यश पांढरे, अनुराग लांबतुरे,अक्षय रजपूत आदी. सर्पमित्र कार्यकत आहेत. सापाविषयी विशेष माहिती
• शहर परिसरातील विजापूर रोड, सोरेगाव, अक्कलकोट रोड, शेळगी भागात सर्पाना अनुकूल वातावरण
• शहर आणि जिल्ह्यात नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे विषारी सर्प आढळून येतात
• थंडीचा ऋतू हा त्यांचा प्रजनन काळ असल्याने ते जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात
• एकाच वेळी ४० ते ६० पिलांना घोणस वर्गातील सर्पाकडून जन्म
• सर्प दंश झालेल्या व्यक्तीने न घाबरता मानसिक आणि शारीरिक स्थिर राहून उपचार घेतल्यास फायदा •अचूक वेळ साधल्याने सर्प आणि नागरिक दोघांचेही जीव वाचविण्यात यश
• मांजऱ्या, हरणटोळ, पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या व मृदुकाय / गजरा आणि रसल कुकरी हे दुर्मिळ साप शहर परिसरात आढळून येतात
सोलापूर जिल्ह्याचे पहिले सर्पमित्र गफूर मुच्छाले यांचे सुपुत्र आयु. अशपाक मुच्छाले, आयु. दिपक इंगळे, आयु. औदुंबर गेजगे, आयु अनिल अलदार अशा अनेक वरिष्ठ सर्पमित्रांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेस मोलाचे ठरत आहे.
%20(27).jpeg)
