दैनिक_लोकशाही_मतदार
पुणे - माझे वडील छत्रपती शाहू महाराज यांचे कट्टर समर्थक होते त्यानी आपली विहीर दलितांना पाणी भरण्यास खुली केली त्यांचे पाठीराखे सर्व दलित लोकच होते त्यांचा मी वारस मुलगा आहे म्हणून मी महामानव शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराने व मार्गाने आपल्याबरोबर काम करीत आहे व करत रहाणार आहे दलित व शोषित वरील अन्याय विरुध्द मी सर्वात पुढे असेन अशी निर्धार व घोषणा श्रीमंत शिवश्री फत्तेसिंह राजे भोसले अध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य यांनी पुणे येथील डा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित दलित पँथर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत २६ आग स्ट रोजी दुपारी तीन वाजता आयोजित केली होती, तर दलितांसाठी शिवरायांचे तथा व्यंकोजी राजे यांचे १३ वे वंशज आता धडाडणार असून पुन्हा एकदा दलित पँथरचे महाराष्ट्रभर झांजवत सुरू झाली आहे
यावेळी दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष आंबादा स शिंदे यांनी या सभेत नवीन पदाधिकारी निवड व नियुक्ती सर्वानुमते जाहीर केली यामध्ये - प्रा अपरान्त अरुण कांबळे मुंबई यांची युवा अध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य ; प्रकाश पगारे मुंबई यांची सह सचिव दलित पँथर महाराष्ट्र राज्य; नरसिंगे लातूर यांची उपाध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य ; जे टी जाधव बार्शी उपाध्यक्ष दलित पँथर महाराष्ट्र राज्य ; सुनील मांडले लातूर जिल्हा अध्यक्ष; अमित कांबळे अध्यक्ष जिल्हा सोलापूर; सुरेश कांबळे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा; मा एस जे कांबळे उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ; विश्वास मोहिते संपादक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर अशा १२ जील्हातील निवड व नियुक्ती करण्यात येऊन नियुक्ती आदेश देण्यात आले यावेळी प्रा रतनलाल सोनाग्रा दलित साहित्यिक ; आणा रोकडे अनेकांनी मार्गदर्शन केले यावेळी दलित पँथर स्मरणिका संपादक बाबू बनसोडे; बोधी सत्वा चे कथा लेखक बाबू बनसोडे व मातोश्री शारदा ताई अंबादास शिंदे यांचेवरील ग्रंथ डॉ. किर्तीपाल गायकवाड संपादित या तीन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला; सूत्र संचालन व आभार डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी मानले सुमारे ८० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
