अकलूज ला परिवहन अधिकाऱ्यांची नियुक्ती बाबत यशवंत पवार यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी )-  यापूर्वी सोलापूर येथील विजापूर रोड येथे असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माळशिरस सांगोला पंढरपूर मंगळवेढा माढा मोहोळ अक्कलकोट बार्शी सह अन्य तालुक्यातील नागरिकांना दुचाकी तीनचाकी चारचाकी बाबत कच्चा परवाना पक्का परवाना वाहनाचे पासिंग फिटनेस टॅक्स या सह सर्वप्रकारच्या कामासाठी तालुक्यातील नागरिकांना सोलापूर येथे यावे लागत होते सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन नेते व माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे म्हणून राज्यसरकार कडे मागणी केली होती विजयसिंह मोहिते पाटील यांनी केल्याने राज्यसरकार ने अकलूज येथे स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु केले होते 
गेल्या अनेक महिन्यापासून अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्याल्यात पूर्ण वेळ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्याने या भागातील तालुक्यातील अनेकांची शासकीय कामे रखडली आहेत पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने अनेक कामे ठप्प असल्याचे समजते
एकाच व्यक्ती कडे दोन पदभार अकलूज ला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची गरज
 सोलापूर आणि अकलूज परिवहन कार्यालयाचा पदभार एकाच व्यक्ती कडे असून अकलूज च्या परिवहन कार्यालयात स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी गरज आहे उपप्रादेशिक कार्यालय अकलूज विभागातील करमाळा माढा पंढरपूर सांगोला माळशिरस या भागातील नागरिकांची आर टी वो कार्यालय मधील स्वतंत्र अधिकारी नसल्याने अनेक शासकीय कामे रखडली आहेत त्यामुळे अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची नेमणूक बाबत राज्यसरकार कडे पाठपुरावा करावा अशी मागणी ग्राहक कल्याण फौंडेशन चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form