अन्न औषध प्रशासनाचे जिंतूरकर यांना माहिती दडवणे भोवणार ! यशवंत पवार करणार पालकमंत्री यांच्याकडे तक्रार



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी ) दिवाळी चा सण मोठा नाही आनंदाला तोटा या म्हणी प्रमाणे दिवाळी सण संपूर्ण देशात मोठया प्रमाणात साजरा केला जातो नवीन कपडे नवीन वाहने सोने चांदी दागिने खरेदी केली जातात त्याच बरोबर दिवाळी गोड व्हावी म्हणून मिठाई मोठया प्रमाणात खरेदी केली जाते मिठाई शिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही गरीब असो वा श्रीमंत आपल्या परीने मिठाई खरेदी करत असतो शिळी किंवा कालबाह्य झालेली मिठाई खाल्याने विषबाधा होते अश्या घटना काही ठिकाणी घडतात शिळी अथवा खराब झालेली मिठाई विक्री करणाऱ्या व्यपारीवर तपासणी करून कारवाई व दंड तपासणी करण्याची जबाबदारी अन्न औषध प्रशासन कार्यलयाची असून त्यासाठी अन्न निरीक्षक नेमलेले आहेत परंतु अन्न निरीक्षक नेमकं काय करतात हा शोधाचा विषय झाला असून खवा या पदार्थांपासून अनेक प्रकारच्या मिठाई बनवली जातात सोलापूर शहरातील खवा पदार्थां बाबत साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांनी अन्न औषध प्रशासन कार्यालय कडे सोलापूर शहरातील खवा पदार्थ विक्री करणाऱ्या व्यापारी यांच्या बाबत खवा तपासणी आढळून आलेले दोष प्रयोग शाळेत तपासणी बाबत चा अहवाल व केलेली कारवाई अशी माहिती माहिती अधिकार कायदा अधिनियम 2005 अन्वये अन्न औषध प्रशासन कार्यालय सोलापूर यांच्याकडे मागवली होती

माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली जिंतूरकर फासतात या कायद्याला हरताळ

 वास्तविकपाहता अर्जदाराने माहिती अधिकारात मागवलेली माहिती उचित वेळेत अर्जदाराला देणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक असते तसा कायदा आहे परंतु माहिती अधिकारात मागवलेली माहिती द्यायची सोडून अन्न औषध प्रशासन चे सहाय्यक आयुक्त जिंतूरकर माहिती दडवण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे माहिती गुलदस्त्यात ठेवण्याची त्यांना सवय तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे

व्यक्तिशः मागवलेली माहिती टपालाने का पाठवली जाते ती ही अर्धवट?

वास्तविक पाहता माहिती अधिकार अर्जामध्ये माहिती टपाला ने किंवा व्यक्तिशा असा दोन प्रकार असतो यशवंत पवार यांनी सोलापूर शहरातील खवा तपासणी कारवाई बाबत माहिती व्यक्तीशः देण्याची मागणी केली होती परंतु अन्न औषध प्रशासन चे सहाय्यक आयुक्त जिंतूरकर यांनी अर्धवट व चुकीची माहिती थेटत टपालाने का पाठवली?

यशवंत पवार करणार पालकमंत्री यांच्या कडे तक्रार

अन्न औषध प्रशासन चे सहाय्यक आयुक्त यांनी माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली केली असून थेट माहिती अधिकार कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासलेला आहे माहिती अधिकरात चुकीचे माहिती देणे माहिती दडवणे मिठाई व्यापारी खवा व्यपारी यांना पाठीशी घालणे असा प्रकार आढळून येत असल्याने साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार हे अन्नऔषध प्रशानाचे सहाय्यक आयुक्त तथा जनमाहिती अधिकारी जिंतूरकर यांच्याविरोधात सोलापूर चे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form