पत्रकार सुरक्षा समिती, राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय कार्यकारणी बरखास्त लवकरच नुतन कार्यकारणी करणार - कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांची माहिती


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर / प्रतिनिधी -  पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. पत्रकार सुरक्षा समिती, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यकारणी बरखास्त केली असून लवकरच नवीन कार्यकारणी तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी पत्रकारांना दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form