जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज साप्ताहिक कार्यसम्राट चे 10 व्या वर्षात पदार्पण

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी )- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सर्वसामान्य माणसांच्या हक्कासाठी वंचित पिढीत घटकाच्या मूलभूत हक्कासाठी लेखणी जिझवणारे वृत्तपत्र म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात निरपेक्ष निर्भीड आणि रोखठोक लेखणीतून प्रशासन दरबारात आवाज उठवणाऱ्या साप्ताहिक कार्यसम्राट 10 व्या वर्षात पदार्पण करत आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर बारीक नजर ठेवून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रशासन दरबारात आगळ्या वेगळ्या लेखणीच्या माध्यमातून वृत्तपत्र व्यवसाय नव्हे ती एक सामाजिक बांधिलकी म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट ने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
 अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त यांच्या पाठीशी साप्ताहिक कार्यसम्राट नेहमीच खंबीरपणे उभा राहिला असून जनसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यात वेगळा ठसा उमटविण्याचा काम साप्ताहिक कार्यसम्राट ने केलं आहे धारदार लेखनी उत्कृष्ट मांडणी निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन साप्ताहिक कार्यसम्राट ची खसियत राहिली आहे आपल्या लेखणीचा आसूड उगारून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या साप्ताहिक कार्यसम्राट 10 व्या वर्षात पदार्पण करत यापुढेही सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट कटिबद्ध राहील
याची हमी देतो
यशवंत पवार
संपादक
साप्ताहिक - कार्यसम्राट सोलापूर
मोबाईल 9921658492

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form