हॉटेल सुर्या एक्झिक्युटिव्ह कै. सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबर ट्रस्ट, सोलापूर सुरवसे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय वतीने निरुपणकार विवेक घळसासी यांची व्याख्यानमाला


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर /प्रतिनिधी - सोलापूरातील उद्योग क्षेत्रात सतत कार्यारत असणारे सोलापूरचे उद्योगपती आदरणीय दत्ता आण्णा सुरवसे यांच्या मित्रपरिवारातर्फे अंत्रोळीकर नगर येथे निरुपणकार विवेक घळसासी यांची व्याख्यानमाला या परिसरात किंवा या भागात बहुसंख्य नागरीकांची मनापासून ईच्छा होती, की या परिसरात एक सुंदर असे सुरवसे शिक्षण संकुल असून अध्यात्मीक विचार भावनेतून निरुपणकार विवेक घळसासी यांचे विषय क्र.१) प्रभु श्रीराम, विषय क्र.२) आदर्श प्रेरक चरित्र अशा दोन विषयावर मधुरवाणीतून व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा. सामाजिक, सांस्कृतीक, क्रिडा क्षेत्र, साहित्य क्षेत्र, उद्योग क्षेत्र अशा विविध क्षेत्राप्रमाणे आदरणीय दत्ता आण्णा सुरवसे यांचे कार्य महान असून नव्यानेच अध्यात्मीक विषय घेऊन ते आपल्या समोर येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दत्ता आण्णा सुरवसे यांनी दिले आहे. या पत्रकार परिषदेस नरेंद्र कटीकर शुभदा देशपांडे रवींद्र नाशिककर अनिरुद्ध देशपांडे , घाडगे सर आदी उपस्थित होते.

विवेक घळसासी यांचा अल्पपरिचय-

१) पत्रकारीताः घराण्यात तीन पिढ्या पत्रकारीता, १९७२ पासून नैमित्तीक स्वरुपात वृत्तपत्रलेखन, दै. लोकसत्ता, दै.लोकमत, दै. सकाळ अशा नेक वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लेखन, मुंबईच्या दै. तरुण भारत मध्ये ४ वर्षे वृत्तसंपादक, सोलापूरच्या दै. तरुण भारतमध्ये १५ वर्षे मुख्य संपादक, आजवर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांवर भाष्य करणारे १०००

२) हून अधिक लेख प्रसिध्द. ग्रंथः- रेघोट्या काव्यसंग्रह, मज फुलही रुताने दोन अंकी नाटक, नित्य निरुपण इ ॥नेश्वरीवरील स्फूट लेख, भारतीयविचार साधना पुणे.

३) युवा चेतनाः- स्वामी विवेकानंद प्रकाशक रामकृष्ण मठ पुणे. १९८० पासून व्याख्याने, २००१ पासून पुर्णवेळ व्याख्याने व प्रवचणे,

४) वकृत्वः- आखील भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादक सहभाग, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र, कर्नाटक राज्यात मराठी आणि अमराठी क्षोत्यांसाठी अनेक व्याख्याने, भारतीलय तत्वज्ञान संत कार्याविषयी युरोपीय देशांमध्ये केवळ युरोपीय लोकांसाठी सलग सहा महिने प्रवास- व्याख्याने चर्चासत्रे मराठी आणि हिंदीतजून श्रीमद् भागवत सप्ताह, तसेच श्रीरामचरितमानस सप्तांहाचेही अनक ठिकाणी आयोजन होत असते. गेल्या दोन तपाहून अधिक काळात तीनएकहजार व्याख्याने दिली.

५) सहयोगः- अध्यक्ष दैनिक तरुण भारत, सोलापूर, चॅनल प्रमुख, टी.व्ही. चॅनल वृत्तवेध सोलापूर, ज्ञानप्रबोधनी सोलापूर, सुयश गुरकुल लोकमंगल उद्योग समुह.


सदरील कार्यक्रम - दिनांक १ जानेवारी २०२४ आणि २ जानेवारी २०२४ सायंकाळी६ वाजल्या पासून असणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form