दैनिक_लोकशाही_मतदार
मुंबई - शौर्य दिनानिमित्त 1 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रासह देशातून आंबेडकर अनुयायी 1 जानेवारी रोजी पुणे मधील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी करोडोच्या संख्येने येतात.भीमा कोरेगाव येथील शौर्य दिन हा आता एक राष्ट्रीय उत्सव झालेला आहे. राजकीय सभा तसेच कुंभ मेळा निमित्त सरकार टोल माफी करतात, त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात शासनाने भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या गाड्यांना टोल माफी करावी. अन्यथा भीम अनुयायी यांच्याकढून टोल फोडले जातील याची दक्षता सरकारने घ्यावी.असा इशारा भीम आर्मी राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे
Tags
मुंबई
