जिल्हापरिषद आंदोलन गेट येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू
दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी) - केंद्र शासनाची "राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान" अंतर्गत खोकेधारक, टपरी धारक, फेरीवाले यांना केंद्र शासनाकडून दिनांक २८ ऑगस्ट २०१४ रोजीच्या शासन निर्णयनुसार संरक्षण दिले असताना महानगरपालिका आयुक्त व अतिक्रमण अधिकारी यांनी खोकेधारकांची कोणतीही बाजू ऐकून न घेता व नोटीस न बजावता खोकेधारकांवर बळजबरीने दहशत निर्माण करुन व पोलिसांचा बडा फौंजफाटा घेऊनगोरगरिबांचे खोके काढण्यात आले असल्याने सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण मुजोर अधिकारी जगन्नाथ बनसोडे पुन्हा वादच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत अतिक्रमण अधिकारी बनसोडे यांच्या
विरोधात खोकेधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत व शासन निर्णया नुसार न्याय मिळणे पर्यंत अन्न पाणी त्याग करुन दिनांक १५/०३/२०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट समोर सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीने सकाळी ११.०० वाजलेपासून बेमुदत आमरण उपोषणास सुरवात करण्यात आले आहे.
धन दांडग्या व राजकीय लोकांच्या अतिक्रमण वर बुलडोजर असाच फिरवणार का? असा संतप्त सवाल खोके धारकांमधून उपस्थित होत असून अतिक्रमण अधिकारी बनसोडे हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद परिसरातील खोके धारक करत असून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना खोके धारक व्यक्त करीत आहेत
उपोषणास्थळी उपोषण कर्त्याच्या जिवीतास किंवा कायदया सुव्यवस्था बिघडल्यास सोलापूर महानगरपालिका आयुक्त व अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांना जबाबदार धरण्यात यावे. अशी भावना उपोषणकर्ते राजाभाऊ बेळ्ळेनवरू यांनी दैनिक लोकशाही मतदार शी बोलताना व्यक्त केली आहे.
