औज (मंद्रूप) जळीतग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन एम के फाउंडेशन चे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी दिला आधार

स्वयंपाक घरात ठिणगी उडून औज(मंद्रुप) येथील उमेश गायकवाड यांचे घर जळून खाक

दैनिक_लोकशाही_मतदार
औज (मंद्रूप )-ता दक्षिण सोलापूर येथील उमेश तुकाराम गायकवाड यांच्या वस्तीवरील घराला गुरुवारी सायंकाळी अचानक स्वयंपाक घरात ठिणगी उडून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य,धान्य, बारदाना, खत, रोख रक्कम जळून खाक होऊन गायकवाड कुटुंबीयांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता. ही माहिती एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच औज ( मंद्रूप ) येथील वस्तीवर जाऊन उमेश गायकवाड कुटुंबीयांची भेट घेऊन अस्थेने विचारपूस करीत संपूर्ण कुटुंबीयांना धीर दिला. उमेश गायकवाड यांच्या वस्तीवरील भले मोठे घर बराच वेळ जळत असलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर पाहून परिसरातील नागरिक ही हळहळ व्यक्त करताना दिसून येत होते. संपूर्ण आयुष्याची पुंजी खर्ची घालून गायकवाड परिवार गेली अनेक वर्षे वस्तीवर घर करुन राहत होते. परंतू बघता बघता उमेश गायकवाड यांचे संपूर्ण घर आग लागून होत्याचे नव्हते झाले होते. आगीचा लोट इतका प्रचंड होता की आग विझवण्याची संधीच ग्रामस्थांना मिळाली नाही. बघता बघता संपूर्ण घराची राखरांगोळी झाली होती. आग लागून गायकवाड कुटुंबीयांचा संसार उघडय़ावर पडल्याने परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती.गायकवाड कुटुंबीयांचा संपूर्ण संसारच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती.तेव्हा एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी त्वरित गायकवाड कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस करीत आधार दिला.तेव्हा उमेश गायकवाड परिवारातील सदस्यांचे अश्रु अनावर होताना पहायला मिळाले.नेहमीच अस्मानी संकटात सापडलेल्या सामान्य माणसांना एम के फाउंडेशन च्या माध्यमातून आधार दिला जातो. आज पुन्हा एकदा एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त उमेश गायकवाड कुटुंबीयांच्या वस्तीवर जाऊन भेट घेऊन आधार देताच एम के फाउंडेशन चे सर्वत्र कौतुक होताना दिसून आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form