रंगपंचमीला रंग खेळताय ? तर "या" गोष्टी आपल्याला नक्कीच माहित असल्या पाहिजेत



दैनिक_लोकशाही_मतदार

संपादक - अक्षय बबलाद 

सोलापूर :- रंगपंचमीला रंग खेळताना रंगांपासून बचाव करणं तितकंच कठीण आहे जितकं हे रंग आपल्या डोळ्यांवर आणि चेह-यावर लागण्यापासून रोखणं अशक्य आहे. अशा परिस्थितीत हे रंग तोंडात किंवा कानात जाणे सामान्य आहे. काही रंगांमध्ये असलेली केमिकल्स इतकी प्राणघातक असतात की त्यामुळे आपल्या डोळ्यांना आणि त्वचेला अॅलर्जी देखील होऊ शकते. त्वचेसोबतच डोळे आणि कानांचे देखील रंगांपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. हे काही प्रथमोपचार या रसायनांपासून आपले रक्षण करू शकतात.रंगांचा उत्सव होळी व रंगपंचमी आपल्यासोबत रंगीबेरंगी आनंद घेऊन येते. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना रंग लावण्यास उत्सुक असते. काय मुलं, काय वृद्ध प्रत्येक माणूस या रंगांमध्ये रंगून जाऊ इच्छित असतो. रंगांशिवाय होळीचा सण अपूर्ण मानला जातो, पण बाजारात विकल्या जाणा-या रंगात भरपूर प्रमाणात केमिकल आणि अॅसिड्स असतात. यामुळे अनेकांना होळी व रंगपंचमी खेळायला आवडत नाही. हे रंग डोळे, कान किंवा तोंडात गेल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.पण काही प्रथमोपचार टिप्सद्वारे आपण होळीच्या रंगामुळे होणा-या अॅलर्जीपासून स्वत:चे संरक्षण करू शकता. जर नकळत डोळे किंवा कानात रंग गेला तर खाली दिलेल्या टिप्स ट्राय करून आपण आपल्या शरीराच्या नाजूक भागांचे नुकसान होण्यापासून वाचवू शकता.  घरात किंवा सोसायटीत तुम्ही सण साजरा करणार असाल तर या टिप्स तुमच्या नक्की कामी येतील.


डोळ्यांचा बचाव कसा करावा? :- 

१- रंगपंचमी खेळत असताना आपल्या डोळ्यांत रंग गेला असेल तर सर्वप्रथम डोळ्यांत थंड पाणी शिंपडा. हे लक्षात ठेवा की पाणी जास्त थंड किंवा जास्त गरमही नसावं.

२- रंगांमुळे डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल तर सूती कपड्याने डोले स्वच्छ करा. डोळे चोळण्यामुळे त्यांचे आणखी नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा.

३- डोळे साफ करूनही तुम्हाला जळजळ होत असेल तर गुलाब पाण्याने डोळे स्वच्छ करा. त्यानंतरही जळजळ कायम राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

४- डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी होळी खेळताना सनग्लासेस जरूर लावा.

५- लेन्स वापरणा-या व्यक्तींनी होळी खेळताना डोळ्यांत लेन्स लावू नये.

६- हाताला रंग असल्यास त्याच हातांनी डोळ्यांना स्पर्श करु नका.


कानांचा बचाव कसा करावा?:- 

१- रंगपंचमी खेळत असताना आपल्या कानात कोरडे रंग गेले असतील तर ताबडतोब मान पुढील बाजूस झुकवा आणि आपल्या कानातून रंग काढून टाका.

यानंतर कानातील उर्वरित रंग काढून टाकण्यासाठी इअरबड्स वापरा.

२- आपले कान सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतंही तेल (खोबरेल तेल) गरम करून कानात घाला आणि नंतर त्यावर कापसाचा बोळा घाला.


तोंडाचा बचाव कसा करावा? :- 

१- होळी खेळत असताना तुमच्या तोंडाचा रंग गेला तर ताबडतोब आणि तोपर्यंत गुळण्या करत राहा जोपर्यंत तोंडातून सर्व रंग बाहेर पडत नाही.

२- रंग तोंडात गेल्यानंतर कमीत कमी 1 तासांसाठी काहीही खाऊ किंवा पिऊ नका.

३- थोड्या वेळानंतर माउथवॉश किंवा कोमट पाण्याने आपले तोंड स्वच्छ करा आणि त्यानंतरच काहीही खा.


या गोष्टींचीही घ्या विशेष काळजी:-

१- नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगांनी होळी खेळा.

होळी खेळण्यापूर्वी आपल्या संपूर्ण शरीरावर तेल लावण्यास विसरू नका.

२- काहीही खाण्यापूर्वी आपले हात एकदम व्यवस्थित स्वच्छ करा.

३- डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी सतत पाणी पित राहा.

सनस्क्रीन लावण्यास अजिबात विसरू नका.

३- जर तुम्ही उन्हात होळी खेळत असाल तर दर 3 तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा.

शरीरावरचे रंग काढून टाकल्यानंतर मॉइश्चरायझर लावण्यास विसरू नका.

४- रंग काढून टाकण्यासाठी सतत आंघोळ करू नका.

५- गोड पदार्थांचे जास्त सेवन करू नका.

ओल्या कपड्यांमध्ये जास्त काळ राहू नका.

आपल्या सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेची काळजी घ्या.

वरील माहिती जाणकारांसोबत चर्चा करून  हा लेख तयार करण्यात आलेला आहे तरी सर्व देशवासीयांनी संपूर्ण काळजी घेऊनच रंग झेलावे असे आवाहन दैनिक लोकशाही मतदार करते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form