एजंटावर कारवाई करा छावा संघटनाची गृहमंत्री व पोलीस महानिरीक्षकांच्याकडे मागणी
दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी )-मंद्रूप पोलीस स्टेशन हद्दीत टाकळी परीसरात अवैध मटक्याचा धंदा तेजीत सुरू आहे, दिवसेंदिवस या धंद्याचे प्रमाण वाढत आहे, येथील पाच ते सहा व्यक्ती मटका बुकी चालवतात, मंद्रूप पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अधिनियम 1887 च्या कलम 12/A प्रमाणे सर्व व्यक्तीवर डझनभर पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, व इतर शिविगाळ करणे,जिवे मारण्याची धमकी देणे ,असे गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत, मंद्रूप पोलीस स्टेशन कडून संबंधित व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 55, 56, व कलम 57 प्रमाणे हद्दपारीची कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती, तरीही यांचा मटक्याचा धंदा तेजीत सुरू आहे , पोलीस प्रशासनाचे कोणतेही भय या लोकांना राहिले नाही, सदरील व्यक्तीपासून समाजास धोका निर्माण होत आहे, अनेक तरूण मटक्याच्या आहारी जात आहेत, संबंधित व्यक्तीपासून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग होत आहे, यांच्या विघातक कृत्यामुळे मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत यांची दहशत निर्माण झालेली आहे, त्यांच्या गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे, लोक घाबरून मटका बुकी चालक विरूध्द तक्रार देण्यास समोर येत नाहीत, तरी या सर्व व्यक्तीवर तातडीने (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हीटी ) अधिनियम 1981 MPDA कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेकडून गृहमंत्री व पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
