कंदलगाव मधील जळीतग्रस्त कुटुंबाला महादेव कोगनुरे यांच्याकडून मदत


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे रहाणारे नरुटे कुटुंबीयांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते. त्यात सुदैवानं जिवितहानी झाली नसली तरी रोख ३५ हजार रुपये, टिव्ही, फ्रिज,ज्वारी, गहू, खते व बी,जनावराचे खाद्य  मोठ्या प्रमाणावर  नुकसान झाले. एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच ङोक्यावरचं छप्पर गमावलेल्या नरोटे कुटुंबाची भेट घेवून त्यांना आर्थिक मदत केली. खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असताना हे लक्षात घेऊन सामाजिक बांधीलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा ह्या धारणेतून आर्थिक मदत  देऊन माणुसकीचा ओलावा टिकविण्याचे काम केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोठेही अशी घटना झाली तर तात्काळ मदत करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.

याप्रसंगी  ग्राम विकास अधिकारी दयानंद पाटील, येळेगावचे सरपंच संजय लोणारे, कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य सहाय्यापा  कांबळे, सहदेव राऊतराव, स्थानिक पत्रकार, जळीत ग्रस्त कुटुंबाचे प्रमुख बनसिद्ध नरोटे व सर्व कुटुंबीय व  शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form