पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.संतोष म्हेत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दैनिक_लोकशाही_मतदार
पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली अनेक वर्षा पासून सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट च्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून संतोष म्हेत्रे यांनी नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे
जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रा ने सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे वृत्तपत्र केवळ बातम्या चे माध्यम नसून तो एक वसा आणि चळवळ म्हणून जिल्हा प्रतिनिधी संतोष म्हेत्रे यांनी पत्रकारिता सुरु केली असून पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आंदोलन उपोषण व निवेदन च्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे सर्व सामान्य व्यक्ती असो वा पत्रकार त्यांच्या अडचणीत धावून जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे पत्रकारांच्या बाबतीत नेहमीच दक्ष व सजग राहून पत्रकारांच्या भल्यासाठी काम करत राहणं हेच आपले कर्तव्य समजून पत्रकारांच्या लढ्यात अग्रभागी राहून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो व त्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही ही भावना मनात ठेवून वंचित पिढीत घटकाच्या विकासासाठी उद्धार करण्यासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भलं करण्याची नेहमीच मानसिकता ठेवून पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे साप्ताहिक कार्यसम्राट चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मा.संतोष म्हेत्रे यांना दैनिक लोकशाही मतदार समूह वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form