आईस्क्रीम पार्लरच्या नावाखाली अश्लील चाळेकर्यांचा आश्रयाचा अड्डा

 


आईस्क्रीम पार्लरच्या नावाखाली अश्लील चाळेकर्यांचा आश्रयाचा अड्डा

सदरबाझार पोलिस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम कपल्स पॉइंट चे अवैध धंदे जोमात सुरू ;कडक शिस्तीचे पोलीस आयुक्त लक्ष घालणार का? - क्रमशः - भाग - १

क्रमशः - भाग - १

दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर | विशेष प्रतिनिधी :- सोलापूरात सदर बाजार पोलिस ठाणे हद्द म्हणजे विविध शासकीय निमशासकीय कार्यालये असणारे पोलीस ठाणे या हद्दितच अनेक भरगच्च व्यवसाय सुरू असतात सोलापुरातील हार्ट ऑफ सिटी समजले जाणारे ठिकाण म्हणजे सात रस्ता परिसर याच सातरस्ता परिसरात अनेक शाळा महाविद्यालये असून युवकांची खाण्या पिण्याची चांगलीच चंगळ असल्याने सातरस्ता परिसर ते पत्रकार भवन पर्यंत विविध खवैयेचे कॅफे ज्यूस सेंटर भव्य दिव्य स्वरूपात थाटलेले दिसून येतात.याच परिसरात कॅफे , आईस्क्रीम पार्लर , ज्यूस  सेंटरच्या नावाखाली युवक युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी एक प्रकारचा अड्डाच निर्माण झाल्याचे चित्र दिसून येते . सोलापुरात गेल्या काही महिन्यांपासून महिला युवती बेपत्ता होत असल्याचे प्रकरण आणि तक्रारी वाढल्या आहेत. अश्या कॉलेजवयीन युवक युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी बेधडक आणि निर्भयपणे धैर्य आणि आश्रय देणारा अड्डा म्हणजेच कपल्स पॉइंट असल्याचे चित्र सद्ध्या दिसत आहे , यावर पोलिस प्रशासनाची भूमिका देखील  हाताची घडी  तोंडावरबोट अशी असून सर्वसामान्यांनसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अश्या अश्लील चाळे कपल्स पॉईंट साठी  नेमका आश्रय कोणाचा ? या ज्यूस सेंटर , आईस्क्रीम पार्लर च्या नावाखाली अवैध धंदे चालवणाऱ्यांना इतके अभय कसे ? यांना आशीर्वाद कोणाचा? आणि या सर्व बाबींकडे आता सदरबाझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय भूमिका घेणार?हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form