दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर - दिनांक २९जुलै २०२३ रोजी शारीरिक काम होत नसल्याने व त्रास होत असल्याने बुधवार पेठ वडार गल्ली येथे राहणारे
नकुल धोत्रे यांना बाळीवेस येथील डॉ. गुलाबचंद शहा यांच्या वर्धमान क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये नकुल धोत्रे यांना ऍडमिट केले होते दरम्यान दिनांक ३१ जुलै रोजी नकुल धोत्रे मयत झाल्याचे डॉ गुलाबचंद शहा यांनी सांगितले नकुल धोत्रे यांचा मृत्यू वर्धमान क्लिनिकमधील डॉक्टर गुलाबचंद शहा यांच्या चुकीच्या उपचारामुळे झाला असल्याचा आरोप धोत्रे कुटूंबाने केला असून या संदर्भात डॉ गुलाबचंद शहा यांच्यावर कारवाई करणे बाबत
दिनांक १/८/२०१३ रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे लेखी अर्ज देणात आला होता त्यानंतर दिनांक ४/८/२०१३ रोजी पोलीस आयुक्त सोलापूर आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आरोग्य मंत्री तानाजी सावंत या मंत्री महोदयांना मेल केलेला आहे त्यानंतर मी वडार महाराष्ट्राचा या संस्थेच्या वतीने मयत नकुल धोत्रे प्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले आहे
मयत नकुल धोत्रे प्रकरणी डॉ गुलाबचंद शहा यांच्यावर कारवाई झाली नसल्याने दिनांक आम्ही उपोषण करणार होते त्या दरम्यान उपोषण करण्यात येऊ म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाणे येथून दिनांक १५/८/२०२३ पत्र देण्यात जाले. त्यानंतर आम्ही दिनांक २०११/ २०२३ रोजी अधिष्ठता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांना व्हिसेरा रिपोर्ट
मिळण्याची मागणी केली होती मयत नकुल धोत्रे यांचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे जनक्रांती पत्रकार संघ वतीने मयत नकुल धोत्रे चौकशी प्रकरणी दिनांक २६/१२/२०२३ रोजी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना निवेदन देण्यात आले होते रुग्णहक्क
संरक्षण समिती वतीने दिनांक २८/१२/२०२३ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले होते. या बाबत कोणतीही कारवाई न झाल्याने रुग्ण हक्क संरक्षण समिती वतीने जिल्हाधिकारी सोलापूर याना दिनांक २९/२/२०२४ वतीने निवेदन देण्यात आले होते. दिनांक १२/१/२०१४ रोजी मुख्य आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांना देखील निवेदन सादर करण्यात आले होते. या संदर्भात कोणतेही कारवाई न झाल्याने दिनांक २६/३/२०२४ मंत्रालय मुंबई आरोग्य मंत्री मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मयत नकुल धोत्रे यांच्या मृत्यूबाबत डॉ गुलाबचंद शहा यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही तरी मयत नकुल धोत्रे यांच्या निधनाला वर्धमान हॉस्पिटल चे डॉ गुलाबचंद शहा हेच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषद मध्ये रुग्ण हक्क संरक्षण समिती चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुमित भांडेकर यांनी केली आहे या पत्रकार परिषद ला धोत्रे कुटूंबातील मयत नकुल धोत्रे यांची पत्नी आरती धोत्रे पूजा धोत्रे भाऊ कुणाल धोत्रे अतुल धोत्रे सह राजेश राऊळ उपस्थित होते.
Tags
सोलापूर